शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

आमदार मेधा कुलकर्णी यांचे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत

By admin | Published: September 02, 2016 5:51 AM

कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे डहाणूकर कॉलनी व किमया हॉटेलसमोरील जनसंपर्क कार्यालय अनधिकृतपणे उभारण्यात आले असल्याची तक्रार स्थानिक नागरिक

पुणे : कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे डहाणूकर कॉलनी व किमया हॉटेलसमोरील जनसंपर्क कार्यालय अनधिकृतपणे उभारण्यात आले असल्याची तक्रार स्थानिक नागरिक कैलास भिंगारे, दिलीप खोपडे यांनी केली आहे.महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडे मेधा कुलकर्णी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयासाठी परवानगी घेण्यात आली आहे का, याची विचारणा कैलास भिंगारे यांनी माहिती अधिकारांतर्गत केली होती. त्यामध्ये त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उभारण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती प्रशासनाकडून त्यांना देण्यात आली आहे.डहाणूकर कॉलनी व हॉटेल किमयासमोर अनधिकृतपणे कार्यालये उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांना तेथून येण्या-जाण्यासाठी मोठा अडथळा होत आहे. त्यामध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली कार्यालये हटविण्यात यावीत. याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी भिंगारे, दिलीप खोपडे, आनंद जाधव, धनराज थोरात, राज गांगुर्डे यांनी केली आहे. ते माझे कार्यालय नाही :‘‘तक्रार करण्यात आलेले माझे जनसंपर्क कार्यालय नाही. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावलेले असावेत. मंडईची नासधूस केल्याप्रकरणी आम्ही काहीजणांविरुद्ध महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत आहेत.’’- मेधा कुलकर्णी, आमदार