पुणे : सागरी प्रदूषणावरील माहितीपट पाहून अस्वस्थ झालेल्या पुण्यातील हाजिक काझी या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने हे प्रदूषण दूर करण्यास उपयुक्त ठरू शकेल, अशा जहाजाचे मॉडेल तयार केले आहे.वाघोली येथील इंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिकतो. समुद्रामध्ये दररोज लाखो टन कचरा फेकला जातो. या कचऱ्याचा सागरी, मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो. यावरील माहितीपट पाहून तो अस्वस्थ झाला. त्यातून सागरामधून वाहतूक करणाºया जहाजांद्वारेच ही समस्या दूर करता येऊ शकेल, अशी कल्पना त्याला सुचली.याबाबत इंटरनेटवरून बरीच माहिती गोळा केली, तसेच पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षकांशी चर्चा करून त्याने सागरी प्रदूषण दूर करणारे जहाजाचे मॉडेल तयार केले. त्याला त्याने ‘ईआरव्हीआयएस’ असे नाव दिले. हाजिकने बनविलेल्या या मॉडेलचे टेड-६ आणि टेड-८ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सादरीकरण केले आहे. सागरी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम समाज जीवनावर होत आहेत. याला अटकाव करण्यासाठी प्रदूषण रोखणाºया जहाजाच्या मॉडेलची कल्पना मला सुचली.- हाजिक काजी, विद्यार्थी,इंडस इंटरनॅशनल स्कूल, पुणे.>असे असेल जहाजजहाजात एक ‘इर्विस सेंट्रिपेटल फोर्स’ नावाची यंत्रणा बसविलेली असेल. ही यंत्रणा समुद्रातील पाणी खेचून घेईल व पाणी, समुद्री जीव आणि कचरा यांचे वर्गीकरण करेल. पाणी व सागरी जीव पुन्हा समुद्रात सोडले जातील. कचरा मात्र गोळा केला जाईल. कचºयाचे प्लॅस्टिक, लाकूड, धातूच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाईल. जहाज किनाºयावर आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल.
आठवीच्या विद्यार्थ्याचा सागरी प्रदूषणावर उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 6:12 AM