शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

शेतीला पाणी मिळण्यात यंत्रणेच्या कूर्मगतीचा अडथळा

By admin | Published: December 13, 2015 11:53 PM

मुळा, मुठा नदीचे अशुद्ध, गटारस्वरूप असलेले पाणी शुद्ध करून शेतीला देण्याचा प्रकल्प गेली अठरा वर्षे यंत्रणा राबवित असूनही, प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळणे कोसो दूर आहे

मुळा, मुठा नदीचे अशुद्ध, गटारस्वरूप असलेले पाणी शुद्ध करून शेतीला देण्याचा प्रकल्प गेली अठरा वर्षे यंत्रणा राबवित असूनही, प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळणे कोसो दूर आहे. पुणे महानगरपालिकेने मुंढवा येथे उभारलेल्या जॅकवेलमधून जुन्या मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची आवश्यक ती सर्व तयारी झाली. जलसंपदा विभागाकडून बेबी कॅनॉल पूर्ववत प्रवाही होण्यासाठी कार्यवाही त्वरेने होत नसल्याने मुळा-मुठा नदीसाठी चांगले दिवस अजून आलेले नाहीत. नदीची प्रदूषणातून मुक्तता झालेली नसल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना, या काळ्यापाण्याची शिक्षा संपणार तरी कधी, असा प्रश्न पडला आहे.सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे जॅकवेल उभारण्यात आले. पाणी नदीतून उचलून जुन्या कालव्यात सोडण्यासाठी तसेच बंधारा ते साडेसतरा नळी या साडेतीन किलोमीटरच्या कालव्यादरम्यान २,७०० मि.मी. व्यासाची दाबनलिका टाकण्याचे काम आॅगस्ट २०१४ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. अद्यापही हे काम कूर्मगतीने सुरु आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते जुन्या कालव्याद्वारे शेतीला पुरविण्याबाबत १९९७ मध्ये महानगरपालिका आणि जलसंपदा विभागात करार झाला होता. परंतु १०० टक्के पाण्यावर प्रक्रिया करणे महापालिकेला शक्य झालेले नाही. नदी सुधार योजनेसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने युद्धपातळीवर मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची सूचना केली. त्यानंतर काही ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले. तरीही मुळा-मुठा नदीचा दाट लोकसंख्येच्या प्रदेशातून वाहताना असलेला काळपट रंग आणि उग्र गंध कायमच आहे. हवेली व दौंड तालुक्यातील बळीराजा आता आपल्या शेतीला यापुढे कायमस्वरूपी पाणी मिळणार, या कल्पनेने सुखावला होता. नदीकाठचे सोलापूरपर्यंतचे नागरिक मुळा-मुठा नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त होणार, तिला जुने वैभव प्राप्त होऊन मलजलातून मुक्त होऊन ती खळखळून वाहणार व काळ्यापाण्याची शिक्षा संपणार या अपेक्षेत होते. जॅकवेलचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटून गेले. केवळ बेबी कॅनॉलचे काम होत नसल्याने जुन्या कालव्यातून पाणी येत नाही, हे पाहून सर्वांचा अपेक्षाभंग झाला असून, नदीतीरावरील नागरिक काळ्यापाण्याची शिक्षा संपण्याच्या आशेवरच आहेत. खडकवासला प्रकल्प व जुना मुठा उजवा कालव्याचे बांधकाम १८८०मध्ये पूर्ण झाले होते. त्याचे हवेली व दौंड या दोन तालुक्यांतील पाटसपर्यंतचे लाभक्षेत्र २०,११८ हेक्टर एवढे आहे.कालव्याची एकूण लांबी १११ किलोमीटर आहे. १९६५मध्ये कालवा किलोमीटर १२ ते १८चे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर नवीन मुठा कालव्यामध्ये करण्यात आले. याच काळापासून जुना मुठा कालवा किलोमीटर १९ ते १११ वापरात नसल्याने त्याची दुरवस्था झाली. या जुन्या कालव्यात फुरसुंगी परिसरात झाडी उगवली आहे. काही भागात राडारोड्याचे भराव टाकले आहेत. पोटचाऱ्यांमध्ये घरांची, झोपड्यांची अतिक्रमणे अनेक वर्षांपासून झाली आहेत. काही बहाद्दरांनी कालव्यात मातीची भर घालून शेती केली आहे.