पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक वाहतूक सुविधेच्या लोकार्पणासाठी पुणे दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी मेधा कुलकर्णी स्वतः पुणे विमानतळावर पोहचल्या होत्या. आज सकाळी पुणे विमानतळावर गडकरी यांच्या स्वागतासाठी भाजपा पुणे शहर वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या बरोबर मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या.
मेधा कुलकर्णी या भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. चांदणी चौकातील कार्यक्रमावरून मेधा कुलकर्णी नाराज असल्याचे चर्चा फेसबुक पोस्ट करत मेधा कुलकर्णी यांनी स्वतः नाराजी व्यक्त करून दाखवली होती. आज मात्र त्या स्वतः गडकरी यांचे स्वागत करण्यासाठी पुणे विमानतळावर पोहचल्या होत्या.
कार्यक्रमस्थळी उपस्थिती-
नाराजीनाट्यानंतर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णीही कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली होती. पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोथरूडच्या आमदार असताना त्यांनी चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख खुद्द वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणात केला होता. या सोहळ्यालाच स्वःपक्षीय नेत्यांकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उपरेपणाची वागणूक मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज नितीन गडकरींकडून मेधा कुलकर्णी यांची नाराजी दुर केली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.