शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू, आजपासून आॅनलाइन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:37 AM

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (दि. ७) आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे.

पुणे : वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (दि. ७) आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. वैद्यकीयसाठी दि. १७ तर अभियांत्रिकीसाठी दि. १९ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने राज्य चाचणी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष असते. त्यानुसार दोन्ही अभ्यासक्रमांची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय कक्षाने घेतला असून, आॅनलाइन अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळाच्या लिंक सुरू होतील. वैद्यकीयसाठी आॅनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. ७ ते १७ जून या कालावधीत सुरू असेल. दि. १८ जूनपर्यंत स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर दि. १९ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. अंतिम गुणवत्ता यादीनंतर पसंतीक्रम अर्ज भरणे, पहिल्या फेरीची निवड यादी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश अशी प्रक्रिया असेल. कक्षाकडून पहिल्या फेरीपर्यंतचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. १ आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू होतील. अभियांत्रिकी प्रवेशाचे तीन फेऱ्यांपर्यंतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आॅनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती दि. ७ ते १९ जून या कालावधीत होईल. पहिली तात्पुरती गुणवत्तायादी दि. २१ जूनला, तर अंतिम गुणवत्ता यादी २४ जूनला जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंती क्रम भरून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप)सुरू होईल. तीन फेºयांपर्यंतची प्रक्रिया दि. २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर तसेच आवश्यक माहिती सीईटी कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यातआली आहे.‘नीट आॅल इंडिया रँक’ नमूद करावैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज भरताना त्यामध्ये केवळ ‘नीट आॅल इंडिया रँक’ नमूद करावा लागेल. बँकेमध्ये चलन भरल्याशिवाय आॅनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांच्या पडताळणीवेळी ही सर्व कागदपत्रे संबंधित केंद्रावर दाखवावी लागतील.वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रकदि.७ ते १७ जून आॅनलाइन नोंदणी व अर्ज भरणेदि.१८ जून नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम मुदतदि.१९ जून (सायंकाळी ५ वाजेनंतर) तात्पुरती गुणवत्तायादीदि.२१ ते २५ जून कागदपत्रांची पडताळणीदि.२६ जून सुधारित तात्पुरती गुणवत्तायादीदि.२६ ते २९ जून आॅनलाइन पसंती क्रम अर्ज भरणेदि.२ जुलै पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध करणेदि.१२ जुलैपर्यंत पहिल्या फेरीनुसार महाविद्यालयात प्रवेशवैद्यकीय प्रवेशची कागदपत्रे पडताळणीसाठी केंद्र१) ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भायखळा, मुंबई२) आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी, मुंबई३) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे४) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर५) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद७) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड८) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबादअभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रकदि. ७ ते १९ जून आॅनलाइन अर्ज नोंदणी, कागदपत्रांचीपडताळणी व अर्ज निश्चितीदि. २१ जून तात्पुरती गुणवत्तायादीदि. २२ व २३ जून यादीवर हरकतीदि. २४ जून अंतिम गुणवत्तायादी व पहिल्याफेरीसाठी जागांची स्थितीदि. २५ ते २८ जून आॅनलाइन पसंती क्रमदि. २९ जून कॅप १ ची निवड यादीदि. ३० जून ते ४ जुलै एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चितीदि. ५ जूलै दुसºया फेरीसाठी रिक्त जागादि. ६ ते ८ जुलै आॅनलाइन पसंती क्रमदि. ९ जुलै कॅप २ निवड यादीदि. १० ते १२ जुलै एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चितीदि. १३ जुलै कॅप ३ साठी रिक्त जागादि. १४ ते १६ जुलै आॅनलाइन पसंती क्रमदि. १७ जुलै कॅप ३ निवड यादीदि. १८ ते २० जुलै एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चितीप्रवेशासाठी संकेतस्थळwww.mahacet.org (वैद्यकीय+अभियांत्रिकी)www.dmer.org (फक्त वैद्यकीय प्रवेशासाठी) 

टॅग्स :collegeमहाविद्यालयPuneपुणे