बारामती : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १७) बारामती शहरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती. डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला आहे. संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये बारामती येथील आयएमएच्या सदस्यांनी सहभाग घेतला. आज (सोमवारी, दि. १७) सकाळी ६ वाजल्यापासून उद्या मंगळवार (दि. १८) सकाळी ६ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बारामती येथे सर्व डॉक्टरांनी एकत्र येत कोलकाता येथील डॉक्टरांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध केला. यावेळी बारामती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, सचिव डॉ. सोमनाथ राऊत, माजी स्टेट प्रेसिडेंट डॉ. अशोक तांबे, खजिनदार डॉ. संतोष घालमे, माजी अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. विभावरी साळुंके आदी डॉक्टर उपस्थित होते...........ओतूर : कोलकाता येथे डॉक्टरावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील सर्व डॉक्टरांनी देशव्यापी बंद पुकारला होता. त्याला पाठिंबा म्हणून जुन्नर तालुका मेडिकल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनने तालुक्यातील सर्व दवाखाने बंद ठेवून बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला, अशी माहिती जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष डॉ. शशांक फापाळे यांनी दिली. तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने चोवीस तास बंद ठेवले होते. १८ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवणार आहेत. यात तातडीची सेवा वगळून बंद पाळण्यात आला. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व डॉक्टरांना धन्यवाद दिले. या विषयी अधिक माहिती देताना जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशनचे संस्थापक डॉ. भरत घोलप म्हणाले, हल्ली डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. या विषयी जो कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी हा देशव्यापी बंद पाळण्यात आला. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. संजय वेताळ, डॉ. सदानंद राऊत, डॉ. रश्मी घोलप, डॉ. प्रवीण डुंबरे, डॉ. सुशील बागूल, डॉ. योगश पाटील उपस्थित होते.
दौंडला डॉक्टरांच्या ‘बंद’ला प्रतिसाददौैंड : दौैंड मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशव्यापी डॉक्टरांच्या संपाला उत्स्फूर्तपणे प्र्रतिसाद मिळाला असल्याची माहिती दौैंड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा सुरेखा भोसले यांनी दिली. भविष्यात डॉक्टरांच्या होणाºया मारहाणीबद्दल संबंधित व्यक्तींना कडक शासन व्हावे, तसेच डॉक्टरांना मारहाण होणार नाही यासंदर्भात शासनाने योग्य ती दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी दौंड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.जुन्नर परिसरात बंदला डॉक्टरांचा १०० टक्के प्रतिसाद