पुणे : औषधांची आॅनलाईन (ई फार्मसी) आणि पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीला विरोध दर्शविण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने २८ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. आॅनलाईन कंपन्या कायद्यात असलेल्या कोणत्याही जबाबदारीचे पालन न करताच औषधांची मागणी नोंदवीत आहेत. गर्भपात किट (एमटीपी), सिल्डेनफिल, टॅडलफिल, कोडेन यांसारखी गुंगी आणणारी औषधे देखील आॅनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जुन्या अथवा बनावट चिठ्ठीवरदेखील औषधे देण्याचे प्रकार घडत आहेत. डॉक्टरांची बनावट ई चिठ्ठी तयार केली जाते. यामुळे मेडिकल दुकानदारांमध्ये अस्वस्थता आहे.
मेडिकलची दुकाने २८ सप्टेंबरला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 5:05 AM