इंदापूर : इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश मोरे यांच्यावर अखेर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई केली आहे .त्यांच्याकडे असणारा इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक चार्ज देखील बुधवार ( दि.२० मे ) रोजी पुढील आदेश येईपर्यंत काढून घेण्यात आला आहे.
डॉ. राजेश मोरे हे पुणे जिल्हयातील इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक पदी रूजू आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. मोरे यांच्या विरुध्द नागरिकांमधून आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या. ते सातत्याने आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका नागरिकांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यांच्या कामकाजाबाबत आरोग्य विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडील वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय इंदापूर जि. पुणे या पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत डॉ. एकनाथ चंदनशिवे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय इंदापूर यांच्याकडे सोपविण्यात असला असल्याबाबत डॉ. श्रीमती साधना तायडे संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी लेखी आदेश दिला आहे. मंगळवारी (दि.१९ मे )डॉ.राजेश मोरे यांनी इंदापूरजवळील सी.सी.सी. (कोरोना केअर सेंटर ) उपचार घेणा-या मायलेकींच्या काही शारीरिक चाचण्यांसाठी सी.सी.सी. केंद्रातून थेट इंदापूर शहरात फिरवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दि.१७ मेपासून या मायलेकींवर इंदापूर शहरानजीक असणा?्या डॉ. कदम गुरूकुलमध्ये उभारण्यात आलेल्या सी.सी.सी. (कोरोना केअर सेंटर ) केंद्रात उपचार सुरु आहेत. .................._______मी खूप खुष आहे, त्रासापासून माझी सुटका झाली.या आदेशाबाबत डॉ. राजेश मोरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक म्हणून काम करणा?्या अधिका?्याला नागरिकांचा प्रचंड त्रास आहे. सध्या मी या त्रासातुन मुक्त आहे ,त्यामुळे मी प्रचंड खुष आहे, आय यम व्हेरी हॅपी नाव..!. अशी प्रतिक्रिया भ्रमणध्वनीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. _________