खेड : नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेला जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीची योग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने हा कचरा स्थानिक रुग्णालये; तसेच खासगी दवाखाने रस्त्याच्या कडेलाच फेकून देत आहेत. मोठी गावे सोडल्यास ग्रामपंचायतीकडेही या कच-याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वैद्यकीय उपचारातून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा हा सर्वाधिक घातक असतो. या कचºयाची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्राच्या आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अतिशय धोकादायक असलेला हा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातो, तसेच जाळला जातो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव करणाºया या कचºयाबाबत ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समितीकडे यंत्रणाच नाही, तसेच हा कचरा संकलन करण्याची काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डातर्फे या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी काही खासगी कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या कंपन्यांकडूनही हा कचरा उचलला जात नाही.खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ या तालुक्यांत दररोज साधारण एक हजार किलो कचरा संकलित करून तळेगाव येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. हा कचरा उचलण्याचे कंत्राट लाईफ सिक्युअर इंटरप्रायझेस कंपनीकडे आहे. यासाठी आठ बंदिस्त वाहने या कंपनीकडे आहे. तीनचार दिवसांनी हा कचरा संकलन करणारी गाडी येत असल्याची तक्रार वैद्यकीय व्यावसायिकांची आहे.जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातील जैव वैद्यकीय कचरा संकलित करण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने निवीदा प्रक्रि येद्वारे काही खासगी कंपन्यांची निवड केली आहे. काही कचºयाची विल्हेवाट ही रुग्णालयाच्या आवारतच खड्डा खोदून केली जाते. मात्र, ग्रामपंचायतींकडे हा कचरा उचलण्याची योग्य यंत्रणाच नाही. मोठ्या ग्रामपंचायती वगळल्यास छोट्या ग्रामपंचायतीमधील दवाखाने हा कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकून देत आहेत.>जैव वैद्यकीय कचºयाचे धोकेश्वसनसंस्था, त्वचा आणि संसर्गजन्य आजार, कॅन्सर यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. या कचºयाच्या संपर्कात आलेल्या मांसातून, दुधातूनही रोग पसरण्याची शक्यता असते.>जैव वैद्यकीय कचरानष्ट करण्याची पद्धतआठशे तापमानास रक्ताशी संबंधित वस्तू इनसिनिरेटरमध्ये जाळल्या जातात.आॅटो क्लेवमध्ये १२१ तापमानास प्लास्टिक वस्तूंवर प्रक्रिया केलीजाते. तर धातूच्या वस्तूंवरसोडियम हायपो क्लोराईडद्वारेप्रक्रिया केली जाते.
वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न गंभीर, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:32 AM