यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे,जिल्हा वसतिगृह उपाध्यक्ष नंदकुमार चासकर,तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर,सहचिटणीस जितेंद्र हांडे,कार्यकारी सदस्य नारायण गोरे, विजय वळसे, जिल्हा संघटक उदयकुमार लोंढे,सरचिटणीस सुनील भेके,शिक्षक नेते विजय घिसे,कोषाध्यक्ष संतोष गाढवे,एकल प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष तुषार शिंदे,प्रवक्ते विजय डोके,प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष ठकसेन गवारी,संस्थेचे उपसभापती चिमा बेंढारी,खजिनदार संजीव ढोंगे,मानद सचिव बाळासाहेब राऊत आदी उपस्थित होते.
राजाराम काथेर म्हणाले, संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे असून,संस्थेने केवळ ९.६०टक्के दराने सभासदाच्या वेतनानुसार ३५ लक्ष रुपये सर्वसाधारण कर्ज मर्यादा व मयत सभासदाचे वारसास १५ लाख रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. संस्थेने खर्चात काटकसर करून ९ टक्के दराने लाभांश दिलेला आहे. भविष्यात संस्थेची अधिकाधिक प्रगती व सभासदांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहील.सुनील भेके यांनी विषय पत्रिकेचे वाचन,सूत्रसंचालन बाळासाहेब राऊत व उपसभापती चिमा बेंढारी यांनी आभार मानले.
०१ मंचर पतसंस्था