शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
3
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
4
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
5
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
6
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
7
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
8
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
9
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
10
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
11
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
12
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
13
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
14
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
16
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
17
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
18
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
19
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
20
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Maratha Reservation: मागासवर्गीय आयोगाची ३ व ४ आॅगस्टला बैठक; आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 6:36 AM

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षणाबाबत जमा झालेल्या माहितीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे.दरम्यान, महिनाभरात मागासवर्गीय आयोगाकडून आरक्षणासंदर्भातील अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार आयोगाच्यासर्व सदस्यांची बैठक घेतली जात आहे.माहिती संकलनाचे काम पूर्ण झाले असले, तरी या संस्थांनीकोणत्या प्रकारे सर्वेक्षण केले आहे, कोणती माहिती जमा केली आहे हे तपासले जाणार आहे. त्यानंतर संबंधित माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून आरक्षणासंदर्भातील अंतिम अहवालाचे लिखाण करण्यात येणार आहे; तसेच सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आणि आरक्षणाचा लाभ न मिळणा-या घटकांमधील तफावतीचासुद्धा अभ्यास केला जाणार असल्याचे समजते.सर्वेक्षणाचे काम पूर्णमराठा आरक्षणासंदर्भात जाहीर जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यात मराठा समाजातील सामाजिक संस्था, सामूहिक संघटना, ग्रामपंचायत आणि वैयक्तिकरीत्यादेखील निवेदने देण्यात आली. तब्बल २६ हजार अर्ज मागासवर्गीय आयोगाकडे प्राप्त झाले आहेत.तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आवश्यक असलेली माहिती प्राप्त व्हावी यासाठी सहा विभागांत सहा संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. आयोगातर्फे या संस्थांना आरक्षणासंदर्भातील प्रश्न देण्यात आले होते. आयोगाने दिलेल्या प्रश्नानुसार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणेreservationआरक्षणmarathaमराठा