कोरोनानंतर बंद केलेली महाविद्यालय सुरू करावी, अशी मागणी काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्यात संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विविध विद्या शाखांमधील प्राध्यापक व प्राचार्य यांचा समावेश आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात बैठक व्यवस्था करता येऊ शकते का?, सुरवातीला अंतिम वर्षाच्या किंवा स्पेशल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करता येतील का?, विज्ञान विषयाचे प्रॅक्टिकल्स सुरु करणे उचित ठरेल का? याबाबत बैठकीत चर्चा केल्याचे समजते.
समितीकडून तयार केलेला अहवाल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतरच महाविद्यालय सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय होईल,असे सूत्रांनी सांगितले.