पुणे : भामा-आसखडे योजनेसाठी धरणातून पाणी उचलण्याबाबत निर्माण झालेला बखेडा सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात महापालिका, पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची संयुक्त बैठक होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान आरक्षित पाणी रद्द करण्याच्या पाटबंधारे खात्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका तसेच पाटबंधारे विभाग यांचा निषेध केला आहे.वडगावशेरी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस, येरवडा व अन्य उपनगरे अशा पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका भामा-आसखेड पाणी योजना करीत आहे.त्यासाठी भामा-आसखेड धरणातील काही पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला होता; मात्र महापालिकेने या परवानगीचे नूतनीकरण करून घेतले नाही, असे कारण दाखवत पाटबंधारे विभागाने पाणीसाठ्याचे आरक्षण रद्द करत असल्याचे पत्र महापालिकेला पाठविले आहे.''राष्ट्रवादीने आक्रमकपणे यावर टीका केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. त्यात महापालिका व पाटबंधारे खाते यांच्यात पाण्याच्या आरक्षणासंबधीपुन्हा नव्याने करार केलाजाईल. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, की योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या पाणी उचलले जात नाही; मात्र योजना पूर्ण झाल्यानंतर धरणातून पाणी घेण्यात येईल.
आरक्षित पाण्यासाठी होणार बैठक,गिरीश बापट यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:55 AM