९६२ सभासद असलेल्या राख सोसायटीचे भाग भांडवल ७३ लक्ष ३८१ असून, बॅंक कर्ज ३ कोटी ३२ लाख ७५ हजार १५३ रुपये आहे. सभासद कर्ज ३ कोटी ३२ लाख ३५ हजार ८१५ तर, निधी १६ लाख ६४ हजार ४७४ आहे. या वर्षी सोसायटीला १० लाख ८३ हजार ४६३ रुपये इतका तोटा झाला आहे. सोसायटीने या वर्षी सभासदांना लाभांश जाहीर केला नाही. अशी माहिती सोसायटीचे चेअरमन महेंद्र माने यांनी दिली.
सोसायटीचे वार्षिक अहवालाचे वाचन सचिव श्रीकृष्ण पवार यांनी केले. सभेला व्हाईस चेअरमन बाबुराव पवार, संचालक व राख ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय रणनवरे, संचालक विलास रणनवरे, हणुमंत रणनवरे, विनायक पवार, राजेंद्र रणनवरे, अतुल रणनवरे, गोरख रणनवरे जेष्ठ सभासद उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या वतीने सभासदांचे स्वागत संचालक विनायक पवार यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन बाबूराव पवार यांनी मानले.