शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

सोमेश्वरच्या प्रचारासाठी सभा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:13 AM

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. प्रचारासाठी सभा घेण्यात ...

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. प्रचारासाठी सभा घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याने सोमेश्वर कारखान्याची बिनविरोधची शक्यता मावळली आहे.

यावेळी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, प्रा. दिगंबर दुर्गाडे, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सभापती नीता फरांदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, विश्वास देवकाते, संग्राम सोरटे, संदीप जगताप, विजय कोलते, शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, शैलेश रासकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा करण्यात येईल, यासाठी कोणीही मुंबईला येऊ नये.

तालुक्यातील अन्य संस्थांवर इच्छुकांना संधी देण्यात येईल. एकाच गावात दोन गट असल्याने कोणीही राग डोक्यात घेऊ नये. तरुण म्हणतात, माझी पहिलीच वेळ तर वयस्कर म्हणतात माझी शेवटची वेळ आहे. त्यामुळे उमेदवार निवडणे अवघड आहे. प्रत्येकाचे संचालक होण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड आहे. सोमेश्वरच्या निवडणुकीत जुन्या नव्यांचा मेळ घालण्यात येईल. कोणीही कोणाला पाण्यात बघू नये, अशा कानपिचक्याही पवारांनी इच्छुक उमेदवारांना दिल्या. तसेच निवडणुकीत दिलेले उमेदवार निवडणूक आणण्याचे काम सर्वांनी एकदिलाने करावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक नियोजन करताना अडचण येत आहे. सोमेश्वर शिक्षण संस्थेची प्रगती होत आहे, तर त्यात अजून भर टाकायची आहे. तिन्ही तालुक्यांत आपलेच आमदार असल्याने उमेदवारी देताना त्यांचेही म्हणणे ऐकून घेणार आहोत. साखर कारखान्यात चुकीचे काम केले, नियोजन बिघडले तर कारखाने बंद पडतात, यासाठी चांगले संचालक मंडळ त्याठिकाणी आवश्यक आहे. पवारांनी सहकारी संस्था बंद पाडल्या, असा आरोप होतो तो चुकीचा असून उलट आम्ही अडचणीतील संस्था बाहेर काढल्या आहेत. यावेळी आमदार संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

.................

चौकट----

माळेगाव कारखान्यात तावरे सोडून इतरांना संधी देणार

सोमेश्वर कारखान्यात आतापर्यंत कै. वसंतकाका जगताप, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, पुरुषोत्तम जगताप यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. माळेगावला कुठलंही संचालक मंडळ आलं तरी तावरे अध्यक्ष असतात, त्यामुळे भविष्यात माळेगाव कारखान्यात तावरे सोडून संधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

--

चौकट

-------

सोमेश्वरने करून दाखवलं----

कारखान्याने मागील पाच वर्षांत कर्जमुक्तीसह उपपदार्थांची अधिकची निर्मिती करत राज्यात उच्चांकी दर दिला. सध्या विस्तारीकरणाचे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिक निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले असून, सोमेश्वरने करून दाखवल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.