पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळादरम्यान इंजिनियरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामांकरिता रविवार (दि. ३) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान १४ लोकल गाड्या रद्द राहतील. तसेच या वेळी गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्याहून लाेणावळाकडे जाणाऱ्या या लोकल गाड्या रद्द
- ०९.५७ ची पुणे स्टेशन -लाेणावळा (क्रमांक 01562)
- ११.१७ची पुणे स्टेशन- लोणावळा (क्रमांक 01564)
-१२.०५ ची शिवाजीनगर-लोणावळा (क्रमांक 01592)
-१५.०० ची पुणे स्टेशन - लोणावळा (क्रमांक 01566)
- १५.४७ ची शिवाजीनगर- तळेगाव (क्रमांक 01588)
-१६.२५ ची पुणे- लोणावळा (क्रमांक 01568)
- १७.२० ची शिवाजीनगर-लोणावळा (क्रमांक 01570)
लोणावळावरून येणाऱ्या लाेकल गाड्या रद्द :-
- 10.05 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01559)
-11.30 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01591)
- 14.50 : लोणावळा- पुणे क्रमांक 01561)
- 16.40 : तळेगाव -पुणे (क्रमांक 01589)
-17.30 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01565)
- 18.08 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01567)
- 19.00 : लोणावळा-शिवाजीनगर (क्रमांक 01569)