पुणे : मध्य रेल्वेनेपुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगाव दरम्यान किमी १५४/०-१ येथे असलेल्या पुल क्रमांक १५४/१ चे लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण ६ आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी रविवारी (दि.९) जून रोजी मेगा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे डेक्कन क्विन या एक्स्प्रेस आणि पुणे-लोणावळा दरम्यान सहा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पाच मेल एक्स्प्रेस गाड्यांचे (दि. ९) नियमन करण्यात येणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखभाल सुरक्षिततेसाठी तसेच अभियांत्रिकी कार्यासाठी हे मेगा ब्लॉक कार्य आवश्यक आहे. यामुळे गैरसोयमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या आहेत गाड्या रद्द-- लोणावळा-पुणे लोकल गाडी क्र. 01561
- लोणावळा-शिवाजीनगर-गाडी क्र.01563- पुणे-लोणावळा गाडी क्र . 01566
- शिवाजी नगर-तळेगाव गाडी क्र. 01588- तळेगाव-पुणे गाडी क्र. 01589
त्याचबरोबर मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११००७), पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११००८), मुंबई-पुणे डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १२१२३) आणि पुणे-मुंबई डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १२१२४) या चार एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या मेल एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन :
एमजीआर चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन १२१६४) ही गाडी ८ जून रोजी ३ तास ३० मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल. मुंबई-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन २२१५९) ही गाडी ९ जून रोजी ३० मिनिटांकरीता रेगुलेट करण्यात येईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस (ट्रेन १७२२२) ही गाडी ९ जून रोजी १५ मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल. तसेच तिरुवनंतपुरम मुंबई-एक्स्प्रेस (ट्रेन १६३३२) ही गाडी ८ जून रोजी १५ मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल. दौंड-इंदूर एक्स्प्रेस (ट्रेन २२९४३) ही गाडी ९ जून ला १५ मिनिटांसाठी रेगुलेट करण्यात येईल.