पुणे : प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल उभारण्याच्या कामानिमित्त रविवारी (दि. १) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी सकाळी ५.२० ते दुपारी १.२० या कालावधीत लोकल तसेच लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल तयार करण्याचे काम सुरू आहे. रविवारी या पुलाचा मुख्य भाग बसविला जाणार आहे. त्यामुळे तब्बल नऊ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. मागील काही दिवसांत पहिल्यांदाच मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ६.३०, दुपारी १२.१५, १ आणि ३ वाजता सुटणारी लोणावळा लोकल रद्द करण्यात आली आहे. तर लोणावळ््याहून सकाळी ७.२५, १०.१०, दुपारी २ आणि ३.४० वाजताच्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या वेळेतील काही लोकल शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तर लोणावळ््याहून येणाºया लोकलही शिवाजीनगर स्थानकापर्यंत धावणार आहे. दौंड स्थानकातून सकाळी ५.४० वाजता सुटणारी आणि पुण्यातून सकाळी ९.४० व दुपारी २.४० वाजता सुटणारी डेमु रद्द झाली आहे. तर बारामती-पुणे डेमु दौंडपर्यंतच धावेल. पुणे-बारामती (स.७.१०), दौंड-पुणे (स.७.०५), पुणे-कर्जत (स.११.१५), पुणे-सातारा (सायं. ६.१०) या पॅसेंजरही रविवारी धावणार नाहीत. काही पॅसेंजर दौंडपर्यंतच धावतील.---------इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस रद्दमुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस हुतात्मा एक्सप्रेस, बिलासपुर एक्सप्रेस या गाड्या रविवारी दोन्ही बाजूने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉकच्या वेळेत काही लांब पल्ल्याच्या गाड्या २० ते २५ मिनिटे थांबविल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.----------
पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी मेगा ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 8:49 PM
मध्य रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानकावर पादचारी पुल तयार करण्याचे काम सुरू आहे. रविवारी या पुलाचा मुख्य भाग बसविला जाणार आहे.
ठळक मुद्देमागील काही दिवसांत पहिल्यांदाच मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक गाड्या रद्द मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस हुतात्मा एक्सप्रेस, बिलासपुर एक्सप्रेस या गाड्या रविवारी दोन्ही बाजूने रद्द