शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोरेगावपार्क, हिंजवडीत पकडले सर्वाधिक तळीराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 10:00 AM

जानेवारी ते मार्च २०१८ या केवळ तीन महिन्यात कोरेगावपार्क येथे तब्बल ३६० तर हिंजवडी येथे ३३९ तळीरामांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : पोलिसांकडून वेळोवेळी दारु पिऊन गाडी चालवू नका असे आवहन करण्यात येते. दारुच्या नशेत गाडी चालविल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु काही तळीरामांना आपल्या प्राणांहून अधिक दारु प्रिय आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण जानेवारी ते मार्च २०१८ या केवळ तीन महिन्यात कोरेगावपार्क येथे तब्बल ३६० तर हिंजवडी येथे ३३९ तळीरामांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.     कोरेगावपार्क व हिंजवडी हा पुण्यातील हायप्रोफाईल भाग म्हणून ओळखला जातो. कोरेगावपार्कमध्ये अनेक बार व मोठमोठाली हॉटेल्स आहेत. तर हिंजवडीला आयटी पार्क म्हणून ओळखले जाते. याठिकाणी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. हजारो कर्मचारी याठिकाणी काम करतात. मात्र या दोन्ही ठिकाणीच्या उच्च शिक्षित नागरिकांकडूनच ड्रण्क अ‍ॅण्ड ड्राईव्ह सारखे गंभीर गुन्हे केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.     काही दिवसांपूर्वीच दारु कमी पडली म्हणून मध्यरात्री दारु घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू झाला होता. महामार्गांवर हाेणाऱ्या अपघतांमध्ये दारु पिऊन गाडी चालविल्याचे अनेक प्रकरणे समोर येतात. दारु पिऊन गाडी चालविताना स्वत:बरोबरच इतरांचा जीव हे तळीराम धोक्यात घालत असतात. वाहतूक पोलिसांकडून अश्या तळीरामांवर अनेकदा कारवाई करण्यात येते. परंतु तरीही अनेकांवर याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे वरील आकडेवारीतून समोर येत आहे. त्यातही कोरेगावपार्क व हिंजवडी या उच्च शिक्षित म्हणवल्या जाणाºया नागरिकांच्या भागातच अधिक गुन्हे घडत असल्याने शिकलेली लोकं  सुधारणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.    याबाबत बोलताना पुण्याचे वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, ड्रण्क अ‍ॅण्ड ड्राईव्ह करु नये याबाबत वाहतूक शाखेकडून नेहमी जनजागृती करण्यात येते. कोरेगावपार्क आणि हिंजवडी सारख्या उच्च शिक्षित म्हणवल्या जाणाºया भागातच शहरातील सर्वाधिक ड्रण्क अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहतूक शाखेकडून पुढेही ड्रण्क अ‍ॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जानेवारी ते मार्च २०१८ या कालवधीत समोर आलेले ड्रण्क अ‍ॅण्ड ड्राईव्हचे गुन्हेकोरेगावपार्क - ३६०हिंजवडी - ३३९सांगवी - १५७विश्रांतवाडी - ६९ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrimeगुन्हा