पुणे : थंडीमुळे पपई, खरबूजच्या मागणीत वाढ झाली आहे.
यामुळे मार्केट यार्डात रविवारी खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली असून, कलिंगडाच्या दरात घट झाली आहे. तर चिक्कू, अननस, सिताफळ, बोरे, मोसंबी,
संत्रा, डाळींब आणि लिंबाचे दर स्थिर होते.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस ५ ट्रक, मोसंबी ४० टन, संत्री ३० ते ३५ टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ५ ते १२ टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, चिक्कू २ हजार गोणी, कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबुजाची १५ ते २० टेम्पो, सिताफळ ५ ते ६ टन, बोरे एक हजार ते बाराशे गोणी इतकी आवक झाली आहे.
--
ढगाळ हवामानचा फुलांना फटका
ढगाळ हवामानामुळे फुलांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांची आवक वाढली. दरम्यान मागणी कमी आहे़. मात्र, शोभिवंत फुलांना मागणीही घटल्याने दरात तब्बल ४० टक्क्यांनी घट
झाली आहे. दरम्यान मार्गशीर्ष महिन्यात फुलांना मागणी वाढून दरही वाढतील अशी अपेक्षा व्यापा-यांनी व्यक्त केली.