विघ्न दूर करण्यासाठी कार्यकर्ते अाले धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 07:58 PM2018-09-15T19:58:46+5:302018-09-15T20:01:06+5:30
पुण्यातील नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाढी झाल्याचे समाेर अाल्याने कार्यकर्त्यांनी मंडळाकडे जमा झालेली वर्गणी त्याच्या अाॅपरेशनसाठी दिली.
पुणे : लहानपणीपासून ताे मंडळाचा कार्यकर्ता अाहे. अाई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मंडळच त्याचं कुटुंब झालं. गणेशाेत्सव जवळ येत असल्याने ताेही अानंदात हाेता. अाणि तेवढ्यात नियतीने त्याचा घात केला. सातत्याने फिट येत असल्याने त्याची तपासणी केली असता मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे समाेर अाले. जवळ पैसे नाहीत, की काेणी नातेवाईक. त्याच्यावर अालेले विघ्न दूर करण्यासाठी गणराय नवी पेठेतील नवशक्ती मित्र मंडळाच्या रुपाने समाेर अाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमलेली वर्गणी त्याच्या उपचारासाठी देऊन त्याला जीवनदान दिले. ही कहाणी अाहे नवशक्ती मित्र मंडळाचा कार्यकर्ता सतीश जाेरी याची.
सतीश हा लहानपणीपासून नवशक्ती मित्र मंडळाचा कार्यकर्ता अाहे. ताे बावीस वर्षांचा अाहे. काही वर्षांपूर्वी अाई-वडिलांचे निधन झाल्याने सतीश एकटाच राहत हाेता. त्याला काेणी नातेवाईकही नाही. घरच्या हलाकीच्या परिस्थीतीमुळे फारसे शिक्षणही घेता अाले नाही. एका बॅंकेत ताे काम करताे. सतीशला सातत्याने फिट्स येत हाेत्या. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी फिट येऊन ताे रस्त्यातच पडला. नागरिकांनी त्याच्या लायसन्सच्या अाधारे त्याला घरी अाणून साेडले. ही गाेष्ट कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्याच्या मेंदूची चाचणी केली. तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे समाेर अाले. डाॅक्टरांनी ताबडताेब अाॅपरेशन करायला सांगितले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कसलाही विचार न करता मंडळाकडे जमा झालेली 75 हजार रुपयांची वर्गणी अाॅपरेशनसाठी दिली. सतीशचे अाॅपरेशन व्यवस्थित झाले. त्याला अाता जनरल वाॅर्डमध्ये हलविण्यात अाले अाहे.
नवशक्ती मित्र मंडळाचे व्यवस्थापक संताेष ठाेंबरे म्हणाले, तात्काळ अाॅपरेशन करावे लागणार असल्याने अाम्ही मंडळाची वर्गणी अाॅपरेशनसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याचे अाॅपरेशन झाले असून त्याची तब्येत सुधारत अाहे. 1962 सालापासून अामचे मंडळ गणेशाेत्सव साजरा करते. सतीश लहानपणापासून अामच्या मंडळाचा कार्यकर्ता अाहे. यंदाचा गणेशाेत्सव अाम्ही साधेपणाने साजरा करत अाहाेत. यंदाची मिरवणूक सुद्धा अाम्ही रद्द केली. अाम्ही सर्वजण अामच्यापरीने सतीशला मदत करत अाहाेत. ताे लवकरात लवकर बरा व्हावा हीच अाम्हा सर्वांची इच्छा अाहे.