पुणे : ‘साहस’ या ट्रेकिंग व सामाजिक संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळावा घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक दिवंगत नितिन करंदीकर यांच्या स्मरणार्थ ‘आठवणीतले करंदीकर’ हा कार्यक्रम घेण्यात आला. करंदीकर यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. दुर्गप्रेमी राजेंद्र गायकवाड अध्यक्षस्थानी होते. निनाद थत्ते, हर्षदा खळदकर, गौरव जगताप, पार्थ डेरे, अभिजीत गायकवाड, प्रदिप ओरपे आदी यावेळी उपस्थित होते. सचिव विजय डेरे यांने आभार मानले.
------------
बिडी बंडलवरून गणेश चित्र हटवा
पुणे : गणेश बिडी बंडलावरचे गणपती बाप्पाचे चित्र काढण्यात यावे अशी तक्रार शिवबा संघटनेचे अध्यक्ष दीपक पावसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे हिंदू धर्माचा अपमान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-----------
ऑनलाईन विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा
पुणे : भारतीय विद्याभवन, मुक्तांगण विज्ञानशोधिका, स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्रातील सर्व प्रयोगांची ऑनलाईन प्रात्यक्षिके दाखवणार असल्याची माहिती नेहा निरगुडकर यांनी दिली.
----------
बेकायदेशीर पाटी काढण्यासाठी चक्री उपोषण
पुणे : भीमा-कोरेगाव येथील लढाईशी काहीही संबंध नसताना विजयस्तंभावर १९६५ व १९७१ च्या भारत-चीन आणि भारत- पाकिस्तान युद्धातील हुतात्मा जवानांची नावे लावली आहेत. ती काढून टाकण्यासाठी बारामतीचे उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांनी गेल्या ६ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे.