: आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने ‘मेरा भारत महोत्सव ७५’ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण
पुणे : तब्बल १५० वर्षे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. अनेक नेत्यांच्या संघषार्तून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण या ७५ व्या वर्षानिमित्त करायला हवे आणि त्यांच्या स्मृती जागवायला हव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आम्ही पुणेकर संस्था आणि देशभरातील ७५ सामाजिक संस्थांतर्फे आयोजित ‘मेरा भारत महोत्सव ७५’ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, डॉ. स्वप्नील शेठ, समीर देसाई, प्रणव पवार, संतोष फुटक, उत्तमराव मांढरे, संतोष पोतदार,पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.