लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : सीईटी, नीट परीक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. अनेक मुलांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत; तरीही नामांकित संस्थेत प्रवेश हवा, असा अट्टहास मुले धरत आहेत. काही ठग प्रवेशाचे जणू मेनू कार्डच घेऊन पालकांना गाठत असल्याचे विदारक चित्र अनुभवास येत आहे.
असा हाेताे व्यवहारपुण्याबाहेरील पालक : मुलाला मॅनेजमेंट काेट्यातून अभियांत्रिकीला ॲडमिशन हवे आहे. किती डाेनेशन लागेल? एजंट : डाेनेशन खूप लागेल. आम्ही कमीत कमी पैशांत करून देताे.पालक : किती द्यावे लागेल? आणि काेणत्या संस्थेत प्रवेश मिळेल? एजंट (संस्थेत सब-रजिस्ट्रार असल्याचे सांगत) : या नामांकित काॅलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी तीन लाख रुपये लागतील. पावती मिळणार नाही. ट्यूशन फी वेगळी भरावी लागेल. पालक : ठीक आहे. प्रवेश हवाय कधी येऊ?एजंट : आजच या. प्रवेश उद्या दुपारपर्यंत क्लाेज हाेतील. तुम्हाला शक्य नसल्यास ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे देऊन पाठवा. आम्ही प्रवेश ओक्के करू. तुम्हाला ऑनलाइन रिसीट मिळून जाईल.नातेवाईक : पैसे घेऊन एक व्यक्ती येत आहे. ताेपर्यंत क्लासरूम, हाॅस्टेल, आदी दाखवा.एजंट : मुलगा आला की त्यालाच दाखवू सर्व. तुम्ही लवकर पैसे मागवून घ्या. नाही तर मी चेकची फाेटाे काॅपी टाकताे. त्या खात्यात तत्काळ तीन लाख टाकायला सांगा. (व्हाॅट्सॲपवर चेकचा फाेटाे पाठवला.)
गडबड वाटल्याने नातेवाइकाने मित्राला बाेलावून घेतले. पालकाला सतर्क केले. संस्थेत जाऊन पावतीची सत्यता तपासली. महाविद्यालय व्यवस्थापन : तब्बल २६ हजार रुपये भरून प्रवेश घेतल्याची पावती बराेबर आहे. परंतु, येथे प्रवेश घेण्यासाठी ट्यूशन फीव्यतिरिक्त काेणतेही डाेनेशन घेतले जात नाही. थेट या आणि प्रवेश घ्या. काेणत्याही मध्यस्थांना पैसे देऊ नका.
नातेवाईक : संबंधित एजंट तुमच्या संस्थेची पावती घेताे आणि पालकांना ती पाठवून विश्वास संपादन करताे, हे कसे शक्य आहे?संस्था : प्रवेशासाठी अनेकदा पालक किंवा नातेवाईक येतात. ते शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतात. त्यानुसार ही व्यक्ती गेली असावी. दुसरा एजंट : नातेवाइकाला फाेन करून मुलाच्या पालकांना तत्काळ तीन लाख रुपये खात्यात टाकायला सांगा.