पुणे : पुण्यातील वंडरफूल रस्त्यावरून मर्सिडिज बेंझ इंडियाचे सीईओ मार्टिन शाँक यांना चक्क रिक्षाने प्रवास करावा लागला. कारण त्यांची मर्सिडिज बेंझ बंदी पडली नाही, तर ते पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या गाडीतून उतरून काही वेळ चालले आणि नंतर रिक्षा करून आपल्या इच्छित स्थळी गेले.
मार्टिन यांनी याबाबतच अनुभव इन्स्टाग्रामवर फोटोसह शेअर केला आहे. त्यावर पुणेकरांनी अनेक सल्लेही दिले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोंडीचा फटका केवळ सामान्य नागरिकांना नाही, तर आलिशान कारचे सीईओंनाही बसला. त्यांच्या पोस्टवर गमतीदार कमेंटही आल्या आहेत. एक कमेंट अशी आहे की, रिक्षातून जाताना एखादा वडापाव ऑर्डर केला असता तर तुम्हाला मजा आली असती. दुसरी एक कमेंट आहे की, आता कोंडीतही आलिशान गाडीत एन्जॉय कसे करावे, त्याचे काही फिचर्स मर्सिडिज गाडीत समाविष्ट करा. काही फॉलोअर्सनी त्यांच्या या डाऊन टू अर्थ विचारांचे स्वागत केले आहे. कोंडीत काय कराल ?
कोंडीत अडकल्यानंतर तुम्ही आलिशान गाडीतून खाली उतरून पुण्यातील वंडरफूल रस्त्यांवर काय कराल ? तुम्ही कार बंद कराल आणि काही अंतर चालत जाल. त्यानंतर कदाचित रिक्षा कराल, अशा प्रकारचा मेसेज मार्टिन यांनी शेअर केला आहे.