- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी महासंघ
----
लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या तात्पुरती कमी होते, हे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्याऐवजी आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे यावर शासनाने भर द्यायला हवा. सध्या सर्वजण आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनासोबत कसे जगायचे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.
- सागर गुजर, संचालक, सिलाई
----
राज्य सरकार लोकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेईल. व्यापाऱ्यांनी आजवर सरकारला पाठिंबा दिला आहे. आताही कडक निर्बंध लागू केले आहेत. यापेक्षा वेगळा लॉकडाऊन काय करणार? सरकारने लसीकरण वाढवण्यावर भर द्यायला हवा. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन मोठे मुहूर्त वाया जाणार असल्याने आधीच व्यापाऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. सर्वांच्या हिताचा राज्य सरकार निर्णय घेत असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेलच; मात्र १५ तारखेनंतर राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने पावले उचलायला हवीत.
- अभय गाडगीळ, संचालक, पीएनजी १८३२, नळस्टॉप