झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्षभर वाहातुक बंद असल्याने मेस बांबुची खरेदी विक्री बंद होती.त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.
सध्या मेस बांबुची विक्री सुरु झाल्याने निरादेवघर धरण भागातील बांबू तोडीला सुरवात झाली आहे.यामुळे कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळणार असल्यामुळे शेतकरी सुखावले आहे
भोर तालुक्यातील निरादेवघर धरण भागात एक महत्वाचे पीक बांबू आहे. या भागातील शेतकरी बांबू लागवड करतात.लॉकडाऊनच्या काळात बांबु विक्री बंद होती. मात्र,बांबूला सध्या बाजारात चांगला भाव मिळत असून मागणीही वाढली आहे.
शेती, हस्तकला,बांधकाम,फर्निचर,विविध वस्तू,कागद उद्योग,वाद्य निर्मिती ,खाद्य इत्यादीसाठी प्रामुख्याने बांबूचा वापर केला जातो. बांबूचे जीवनचक्र ४० ते १०० वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.कमी जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही.माञ वादळी वारे,पाऊस यामुळे बांबु मोडुन पडतात. रानडुक्कर, सायाळ उगवलेली बांबुची रोपे खातात. डोंगर उतारावरील जमिनीवरही बांबूची लागवड करता येते.त्यामुळे लागवड केल्यानंतर थोडी काळजी घेतल्यावर खात्रीशीर उत्पन्न बांबू लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून मिळायला सुरुवात होते.
हिर्डोशी खोऱ्यातील नीरा देवघर धरणाच्या दोन्ही बाजुचा परिसर,रायरी,कंकवाडी,गुढे निवंगण शिरवली,कुडली,शिरगाव शिळींबभाग,म्हसर खोरे,या ठिकाणी बांबुची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत.त्याचप्रमाणे आपटी, नांदगाव,कारी खोरे,आंबवडे खोरे या भागात ही बांबूची बेटे आहेत त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पन्न होते
हिर्डोशी भागात बांबू पासून वस्तू निर्मिती संबंधी जनजागृती करणे गरजेचे अाहे. कृषी,वन तसेच बांबू विषयी शासकीय संस्था यांनी या भागात येऊन कार्यशाळा भरवून बांबू संबंधीत असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोचवून त्यापासून भागातील शेतकर्यांना व युवकांना रोजगार उपलब्ध करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करावी.
- सुरेश राजिवडे, माजी सरपंच, म्हसर खुर्द
भोरला बांबु फर्निचर युनिट लवकरच सुरू होणार आहे.मशिन उपलब्ध असुन युनिट चालवण्यास ट्रेनिंग देण्यात येणार आहे कोरोनाची स्थिती पाहुन भाटघर येथील बांबू ट्रिटमेंटची नवीन बॅच सुरु करण्यात येणार आहे. नसरापुर येथे बांबू डेपो सुरु करुन लिलाव पध्दत चालु करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे.
- दत्तात्रय मिसाळ,वनपरिक्षेत्र अधिकारी,भोर
चौकट
लाँकडाऊनच्या काळात वर्षभर बाबु तोड बंद होती त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. या महिन्यापासुन व्यापारी येऊन बांबु घेऊ लागले आहेत.दररोज बांबु तोडणे वाहातुक करणे आणी गाडी भरणे यासाठी रोज ३०० ते ३५० रु रोज मिळत आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. पुन्हा लाँकडाऊन झाल्यास उपासमार होण्याची भिती असल्याचे मेस बांबु तोडणारे कामगार (टोळी) प्रदीप पारठे,गेनबा खरुसे,भाऊ पारठे,भागुजी पारठे,नथुराम पारठे,दिनकर पारठे,लक्ष्मण न-हे यांनी सांगितले.
कोंढाळकरवाडी (कोंढरी) ता भोर येथे मेसबांबु तोड करताना कामगार फोटो