बारामती : सततच्या पाणीटंचाईमुळे दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे, यासाठी बारामतीतील तरुणांनी सायकलवरून जल बचाव अभियान सुरू केले आहे. त्याला येथील यादगार सोशल फाउंडेशनने सहकार्य केले आहे. या अभियानाची सुरुवात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताधिकारी नीलेश निकम यांच्या हस्ते करण्यात आली. बारामती शहरातील तरुण सायकलवर भ्रमंती करून जलजागृती करणार आहेत, असे यादगार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज बागवान यांनी सांगितले. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपनगराध्यक्ष जय पाटील, तहसीलदार हनुमंत पाटील, सभापती संजय भोसले यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. या उपक्रमाचे अजित पवार यांनी कौतुक केले. दिवसेंदिवस पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे पाणी बचतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी बचतीसाठी सायकलवरून संदेश
By admin | Published: May 05, 2017 2:11 AM