शिरूर शहरात
माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल रॅली’ सह लहानग्यांसह वृद्ध नागरिकांनी हरित शिरूर प्रदूषणमुक्त शिरू”चा संदेश दिला.
शिरुर नगर परिषद, सायक्लोनग्रुप, ग्रीन थॉट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा २०१९ अंतर्गत व उद्योगपती प्रकाश धाारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त्त शिरूर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट, हेल्मेट, व मेडल देण्यात आले. शिरूर नगरपरिषद नवीन इमारतीच्या मैदानापासून शिरुर नगर परिषद सभागृहनेते उद्योगपती प्रकाश धारिवाल त्याच्या पत्नी दिनाभाभी धाारिवाल, साक्षी धाारिवाल, आदित्य धाारिवाल, युवा नेते ऋषीराज पवार यांच्या हस्ते या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात झाली.
शेकडो लहान, मुले, मुली, महिला, पुरुष, वृद्ध, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, उद्योगपती प्रकाश धाारिवाल, आदित्य धाारिवाल, युवा नेते ऋषीराज पवार यांनी सहभाग घेतला होता.
शिरुर नगर परिषद नगराध्यक्ष वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सराफ व्यावसायिक धरमचंद फुलफगर, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे , पुणे
येथील व्यावसायिक दिलीप बोरा, माधुरी बोरा, आदेश बोरा, सायक्लोन ग्रुपचे महेंद्र फुलफगर, कुमार बरमेचा, प्रितेश कोठारी, डॉ. गंगाधर आगलावे, डॉ. कविता आगलावे, अमोल कर्नावट, आनंद मुथा, ज्ञानेश मांढरे, प्रितम भळगट, विशाल जोशी, परेश बोथरा, ग्रीन थॉट्स ग्रुपचे सोनाली बरमेचा, शिल्पा संघवी, पूनम गांधी, नगरसेवक, नगरसेविका नागरिक उपस्थित होते.
पेट्रोल डिझेलसारखी वाहने कमी वापरून सायकलचा वापर नागरिकांनी करावा व झाडे लावून त्यांचे संगोपन प्रत्येकाने करावे, असे आवाहन शिरुर नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी केले .
नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस तरी सायकलचा वापर व पायी चालणे याचा वापर केल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढून नागरिक हे सदृढ राहणार आहे. सायकल चालवणेमुळे पर्यावरणाबरोबर नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होईल. असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले .