शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

पुण्यातील वाहतूककोंडी भेदण्याला मेट्रोचा हातभार : निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 1:40 PM

महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे..

ठळक मुद्देपुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे १५ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीमदोन मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याची टीका

पुणे: मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याची टीका लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. तातडीचे प्रतिसाद पथक म्हणून एक पथक स्थापन केले आहे. पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे १५ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीमच तयार केली आहे.वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे ३१ किलोमीटर अंतराचे दोन मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट, कृषी महाविद्यालय ते स्वारगेट व वनाज ते सिव्हिल कोर्ट, सिव्हिल कोर्ट ते रामवाडी असे या दोन्ही मार्गाचे चार भाग तयार केले आहेत. त्यातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. मात्र, वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट, सिव्हिल कोर्ट ते रामवाडी या तिन्ही मागार्चे काम जोरात सुरू आहे. याच तीन मार्गांवर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे.रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना पत्र्यांचा आडोसा करून काम सुरू असते. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच पावसाने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. मोठी वाहने त्यात अडकून पडतात. वनाजपासून पुढे एसएनडीटी महाविद्यालयाजवळचा कर्वे रस्ता एका बाजूने वाहतूकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे वळसा घालून वाहनांना जावे लागते. या सर्व कारणांमुळे कर्वे रस्ता, गरवारे महाविद्यालय, करिष्मा सोसायटी, पौंड रस्ता, सिव्हिल कोर्ट, कृषी महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबते आहे.ही बाब लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या किशोर कारंडे, सुभाष जांभळे, महादेव गावडे, राजेंद्र सावंत अशा ४ अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांना चार मार्ग दिले आहेत. त्यांच्या साह्याला वाहतूक शाखेतच काम केलेले पोलिस निरीक्षक दजार्चे ४ ते ५ निवृत्त अधिकारी दिले आहेत. या निरीक्षकांनी प्रत्येकी ३० ते ४० ट्रॅफिक वॉर्डन दिलेले आहेत. प्रत्येक मार्गावर हे अधिकारी व वॉर्डन कार्यरत असतात. कोंडी होऊ नये यासाठी नियंत्रणाचे काम करतात. वाहतूककोंडी झाली की तिथे हे वॉर्डन नियंत्रणाचे काम करतात. त्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना साह्य करतात. त्यांना स्वतंत्र गणवेश, शिट्टी, ओळखपत्र देण्यात आले आहेत.याशिवाय क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून चार जीप या पथकांच्या मदतीला दिल्या आहेत. त्यात प्रत्येकी ४ वॉर्डन असतात. त्याशिवाय प्रथमोपचाराचे सर्व साहित्य असते. अपघाताची माहिती मिळताच सर्वात जवळ असलेले वाहन तिथे त्वरीत पाठवण्यात येते व काम सुरू करते. जखमींना उपचार करणे, जास्त जखमी असतील तर त्यांना लगेच रुग्णालयात पोहचवणे, अपघातातील वाहनामुळे रस्ता अडला असेल तर वाहन बाजूला करणे ही कामे या टीमकडून केली जातात. ........त्वरीत प्रतिसाद पथकाची स्थापना शहरातील अन्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असली तरी मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ती सातत्याने होत आहे. त्यामुळे मेट्रोबाबत नागरिकांमध्ये रोषाची भावना तयार होऊ नये यासाठी महामेट्रो कंपनीकडून काळजी घेण्यात येत आहे. तरीही वाहनांची एकूण संख्या, वाहनधारकांकडून होत असलेला नियमभंग यामुळे वाहतूककोंडीवर आणखी प्रभावी उपाय अंमलात आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोTrafficवाहतूक कोंडी