शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

मेट्रो, रिंग रोड, नदी सुधारणेला प्राधान्य

By admin | Published: March 28, 2017 2:45 AM

रिंगरोड, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, विशेष डाटाबेस डिजीटल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी

पुणे : रिंगरोड, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, विशेष डाटाबेस डिजीटल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी भरिव तरतूद असलेला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा ७९९ कोटी ६५ लाख रुपयांचा अर्थसंकल्पास मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी व मंजूरी देण्यासाठी सोमवारी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार माधुरी मिसाळ, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त दिनेश वाघमारे उपस्थित होते.महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम-२०१६ नुसार स्थानिक प्राधिकरण आणि नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रात अग्निशमन केंद्र स्थापन करून कार्यान्वित करण्यासाठी अग्निशमन शुल्काद्वारे ३५ कोटी रक्कम जमा अपेक्षित आहे. तसेच यासाठी १५ कोटी रुपये भांडवली खर्चाची तरतूद केली आहे. प्राधिकरणाच्या अत्याधुनिक कार्यालयासाठी ५ कोटींची तरतूद आहे. याशिवाय पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यासाठी २० कोटी, येरवडा येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी ४५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रिंगरोडसाठी १४६ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधाच्या विकास बरोबरच इंद्रायणी व अन्य नद्यांचा सुधारणेसाठी १० कोटी रुपये, पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड उपनगरीय रेल्वेसाठी ९ कोटी ३ लाख रुपयांची तरतूद आहे.तुकाराम मुंढे पीएमपीएमएलसाठीच अनधिकृत बांधकाम व इतर अनेक धडक कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुण्याच्या पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. परंतु अद्याप त्यांनी पदभार स्विकारला नसल्याने त्यांची दुसरीकडे पोस्टींग होण्याची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता पीएमपीएमएलसाठी पूर्णवेळ अधिकारी म्हणूनच मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.