शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मेट्रो मार्गातील अडथळे कायमच : रामवाडीचा मार्ग कल्याणीनगरमधूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 12:45 IST

भुयारी मार्गाचे काम घेणाऱ्या कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू झालेले असतानाही अद्यपी फडके हौद चौकातील बाधित कुटुंबांचा प्रश्न सुटलेला नाही...

ठळक मुद्देफडके हौदाचा निर्णय प्रलंबित मेट्रोचे किमान १०० कोटी रूपये जास्तीचे खर्च होणारकृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरूमेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे एकूण काम ३१ टक्के

पुणे: मेट्रोच्या मार्गातील अडथळे अजून कायमच आहेत. भुयारी मार्गाचे काम घेणाऱ्या कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू झालेले असतानाही अद्यपी फडके हौद चौकातील बाधित कुटुंबांचा प्रश्न सुटलेला नाही. रामवाडीकडे जाणारा मार्गही आगाखान पॅलेससमोरून जाण्याऐवजी कल्याणीनगरहून वळसा घेऊनच न्यावा लागणार आहे. दिल्लीतून हा प्रश्न सोडवू व वेळ पडल्यास भुयारी मार्ग करू, पण मार्ग आगाखान पॅलेससमोरूनच जाईल, असे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी ते पालकमंत्री असताना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासंदर्भात काहीच झालेले दिसत नाही. कारण हा मार्ग आगाखान पॅलेससमोरून वळवून कल्याणीनगरकडे व तिथून रामवाडीकडे नेण्याचा पर्याय वापरात आणण्यात आला आहे. कल्याणीनगरजवळ त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. महामेट्रो कंपनीच्या अभियंत्यांनीच याची माहिती दिली. त्यामुळे १ किलोमीटरला जास्तीचा वळसा पडून त्यावर मेट्रोचे किमान १०० कोटी रूपये जास्तीचे खर्च होणार आहेत. आगाखान पॅलेस राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत आहे व त्यांनी हा मार्ग त्यांच्या संरक्षक भिंतीपासून १०० मीटरच्या आत येत असल्याची हरकत घेतली होती. त्याशिवाय कल्याणीनगर परिसरातील रहिवाशांनी तेथील पक्षी अभयारण्याचे कारण देत या मार्गाला विरोधही केला आहे.कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. स्वारगेटपासून व कृषी महाविद्यालयापासून अशा दोन्ही ठिकाणांहून हे काम सुरू होणार असून भूयार खोदणारी यंत्र फडके हौद चौकातून वर काढण्यात येणार आहेत. तिथे मेट्रोचे स्थानकही आहे. या कामात त्या भागातील सुमारे १०० कुटंबे बाधित होत आहेत. त्यांना महामेट्रो कंपनीने त्याच परिसरात नव्याने जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना ते मान्य नाही. याही कामात बापट यांनी मला कसब्यातील सर्व अडचणी माहिती आहे व त्या बाधीत कुटुंबाला कुठेही जावे लागणार नाही याची काळजी घेऊ असे सांगितले आहे. त्यामुळेच की काय पण या कुटुंबांकडून कंपनीच्या वतीने होत असलेल्या सर्वेक्षणाला सहकार्य केले जात नाही.कोणत्याही भुयारी मार्गाचे काम करायचे असेल तर त्याआधी त्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५० मीटर अंतरावरील सर्व इमारतींचे सर्वेक्षण केले जाते, त्याचा अभ्यास केला जातो. मार्गात खडक आहे की माती, खोदकाम केले तर कोणत्या इमारतींना धोका होऊ शकतो अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या अभ्यासात आहे. फडके हौद ते स्वारगेट या मार्गात १ हजार ४ इमारती आहेत, तर कृषी महाविद्यालय ते फडके हौद या मार्गात ५५६ इमारती आहेत. त्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र फडके हौद चौकातील इमारत मालकांनी असे सर्वेक्षण करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे तिथे काहीही काम झालेले नाही, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे एकूण काम ३१ टक्के झाले आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय हे दोन्ही मार्ग डिसेंबर २०१९ अखेर सुरू करण्याचे उद्दीष्ट महामेट्रो ने ठेवले असून त्यादृष्टिने कामाला गती देण्याबाबत ठेकेदार कंपनीला सुचना केल्या आहेत. बांधकाम पुर्ण झाल्यानंतर लगेचच विद्यूत व्यवस्थेचे कामही सुरू करण्यात येणार असून त्याची निविदा वगैरे सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. मेट्रोची बोगी वेळ पडल्यास नागपूरहून मागवण्यात येणार असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका