MHADA Pune Lottery Result: म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत; ७१ हजार पैकी ३६६२ अर्जदारांचे नशीब चमकणार…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:27 IST2025-01-28T10:23:09+5:302025-01-28T10:27:47+5:30

MHADA Pune Lottery 2024 Result: गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढणार लॉटरी

MHADA lottery drawing tomorrow 3662 out of 71 thousand applicants will be lucky | MHADA Pune Lottery Result: म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत; ७१ हजार पैकी ३६६२ अर्जदारांचे नशीब चमकणार…

MHADA Pune Lottery Result: म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत; ७१ हजार पैकी ३६६२ अर्जदारांचे नशीब चमकणार…

MHADA Pune Lottery Result 2024: म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या घरांची सोडत बुधवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. या सोडतीसाठीच्या ३ हजार ६६२ सदनिकांसाठी एकूण ९३ हजार ६६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ७१ हजार ६४२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून, त्यांचा सोडतीत समावेश केला आहे, अशी माहिती ‘म्हाडा’तर्फे देण्यात आली.

म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते या सोडतीची घोषणा १० ऑक्टोबरला करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये एकूण ६ हजार ४२० सदनिकांचा समावेश केला होता. त्यापैकी २ हजार ७५८ सदनिकांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, पंढरपूर येथील म्हाडा योजनेची २८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील म्हाडा योजनेची ६५ व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३ हजार ५६९ सदनिकांचा सोडतीसाठी समावेश केला होता. अर्जदारांच्या विनंतीनुसार तसेच दिवाळी व विधानसभा निवडणुकांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.

लिंकवरही पाहता येणार निकाल

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेमधील २ हजार ७५८ सदनिकांसाठी सुमारे १ हजार ३७५ अर्ज प्राप्त झालेले असून, सोडतीसाठीच्या उर्वरित ३ हजार ६६२ सदनिकांसाठी एकूण ९३ हजार ६६२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ७१ हजार ६४२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सोडतीचा कार्यक्रम मंत्रालयातून बुधवारी (दि. २९) ऑनलाइन होणार आहे. अर्जदारांसाठी जिल्हा परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृहात कार्यक्रम होणार आहे. ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य नाही त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लिंक पाठविण्यात येणार आहे.

Web Title: MHADA lottery drawing tomorrow 3662 out of 71 thousand applicants will be lucky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.