शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

MHT CET 2024: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल गुण प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 8:54 AM

पुणे जिल्ह्यातील साेहम भीमराव लगड पीसीबी ग्रुप, आदित्य अजित करपे पीसीबी आणि अमलेश उमाकांत घाटे पीसीएम या तिघांचा समावेश आहे...

MHT CET result 2024| पुणे : राज्य सामाईक परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी पीसीएम- पीसीबी ग्रुप निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमध्ये ३७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील साेहम भीमराव लगड पीसीबी ग्रुप, आदित्य अजित करपे पीसीबी आणि अमलेश उमाकांत घाटे पीसीएम या तिघांचा समावेश आहे.

एनटी बी प्रवर्गातून पुण्याचा देवेश रवींद्र माेरे पीसीएम ग्रुपमधून ९९.९०८१८०३ पर्सेंटाईल गुण घेत दुसरा तर एनटी- सी प्रवर्गातील पीसीबी ग्रुपमधून ओम महादेव गाेचडे याने ९९.९९५३५४९ पर्सेंटाइल गुण घेतले आहेत. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी सीईटी सेलतर्फे यंदा २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत एमएचटी सीईटी- २०२४ परीक्षेचे आयाेजन केले हाेते.

पीसीबी ग्रुप २२ ते ३० एप्रिल आणि पीसीएम ग्रुप २ ते १६ मे या कालावधीत एकूण १५९ केंद्रांवर परीक्षा पार पडल्या. त्यामध्ये राज्याबाहेरील १६ केंद्रांचाही समावेश हाेता. यंदा पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख १४ हजार ६७५ आणि पीसीबी ग्रुपसाठी ४ लाख १० हजार ३७७ उमेदवारांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी अनुक्रमे २ लाख ९५ हजार ५७७ आणि ३ लाख ७९ हजार ८००, अशा एकूण ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी परीक्षा दिली हाेती.

टॅग्स :examपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसHSC / 12th Exam12वी परीक्षा