शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

Video: बारामतीच्या मोरे बंधूंची हलगी कडाडताच खुद्द मायकल जॅक्सन कारमधून उतरला होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:10 PM

राज ठाकरेंचे मित्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळी आपला लेझीम संघ जॅक्सन याच्या स्वागतावेळी मुंबई येथे नेला होता. या लेझीम संघामध्ये बाभूळगावचे मोरे बंधू हलगी वादन करीत असत. (michael jackson in mumbai, michael jackson danced on halgi babhulgaon)

ठळक मुद्देया गावामध्ये जवळपास १२ पट्टीचे हलगी वादक आहेतविठ्ठल लक्ष्मण मोरे आणि रमेश रामा मोरे यांच्या हलगीच्या ठेक्यावर फक्त महाराष्ट्रच नाही तर अगदी दिल्लीसुद्धा थिरकली आहे

-रविकिरण सासवडे

बारामती (पुणे): त्यांच्या हलगीचा कडकडाट अगदी असमंत भरून राहतो. बघ्यांची पाऊले आपसूक थिरकू लागतात. ठेका खिळवून ठेवतो. इतकेच काय जागतिक किर्तीचा पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला देखील बाभूळगाव (ता. इंदापूर) हलगी सम्राटांनी भूरळ घातली होती. इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठचे बाभूळगाव हे हलगी सम्राटांचे गाव म्हणून राज्यभर ओळखले जाते. या गावामध्ये जवळपास १२ पट्टीचे हलगी वादक आहेत. यामध्ये विठ्ठल लक्ष्मण मोरे आणि रमेश रामा मोरे यांच्या हलगीच्या ठेक्यावर फक्त महाराष्ट्रच नाही तर अगदी दिल्लीसुद्धा थिरकली आहे. १९९६ साली युती सरकारच्या काळात मुंबई येथे मायकल जॅक्सनचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाचे सर्व आयोजन राज ठाकरे यांनी केले होते.

राज ठाकरेंचे मित्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळी आपला लेझीम संघ जॅक्सन याच्या स्वागतावेळी मुंबई येथे नेला होता. या लेझीम संघामध्ये बाभूळगावचे मोरे बंधू हलगी वादन करीत असत. यावेळी अंधेरीच्या विमानतळावर मायकल जॅक्सनचे स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीने झाले होते. मात्र मोरे यांची हलगी कडाडताच मायकल जॅक्सन त्या आवाजाने चारचाकीमधून खाली उतरला. त्याने मोरे बंधूंच्या हलगी वादनलाला टाळ्या वाजवून दाद दिली. या घटनेचा तत्कानिल व्हिडीओदेखील उपलब्ध आहे. अगदी काही क्षणांचा व्हिडीओ तेव्हापासून मोरे बंधूंनी अगदी जपून ठेवला आहे.  मोरे बंधूंची हलगी वाजायला लागली की आजही बाभूळगावातील तरून लेझीमवर ताल धरतात. मोरे बंधूंनी मुला-मुलींचे लेझीम संघ तयार केले आहे. राज्यभरातील लेझीम स्पर्धांमध्ये मोरे बंधूचे लेझीम संघ उतरतात. बाभूळगावचा लेझीम संघ आणि हलगी म्हंटले की, बघ्यांची तोबा गर्दी उसळते. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारावर मोरे बंधूंनी आपले नाव कोरले आहे.

मान्यवरांची देखील कौतुकाची थाप...मोरे बंधूंनी आजपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी हलगी वादन केले आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दादर येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ अभिनेते रमेश देव खुद्द तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मोरे यांच्या हलगीवर ठेका धरला होता. तर १९९९ साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गणेश फेस्टीवलमध्ये मोरे बंधूंच्या हलगी वादनाचे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कौतुक केले होते. त्याची आठवण आजही मोरे बंधू अभिमानाने सांगतात.हलगीनेच ९० माणसांचे कुटूंब एकत्र बांधले...हलगी म्हणजे आमची लक्ष्मी आहे. आजवर जे काही दिले ते हलगीनेच दिले.  शिक्षणाचा गंध नसल्याने अनेक मोठ्या माणसांबरोबरच्या त्या क्षणांची आठवण आम्हाला ठेवता आली नाही. मात्र आजही ते दिवस जसेच्या तसे आठवतात. आम्हाला अजूनही राज्यातील कोणत्याही भागात हलगी वाजवला गेलो तर मायकल जाक्सनला नाचवणारे हलगी सम्राट म्हणून ओळखले जाते. आमचे ९० माणसांचे कुटूंब हलगीने आजही एकत्र बांधून ठेवले आहे. हलगीच्या जोरावरच आमची मुले शिकली आणि आमची शेतीसुद्धा बागायती झाली.- विठ्ठल मोरे, (हलगी सम्राट, बाभूळगाव)- रमेश मोरे, (हलगी सम्राट, बाभूळगाव)

कोरोनामुळे १५ ते २० लाखांचे नुकसान...कोरोना संचारबंदीमुळे सध्या यात्रा-जत्रा, कुस्तीचे आखाडे, मोठमोठाले सण समारंभावर निर्बंध आले आहेत. त्याचा परिणाम लोककलांवतांवर मोठ्याप्रमाणात झाला. तसा तो बाभूळगावच्या हलगी वादकांवर देखील झाला. महिना ६० ते ७० हजारांची मिळणारी सुपारी कोरोनामुळे बंद झाली. परिणामी मागील दीड वर्षात सुमारे १५ ते २० लाखांचे नुसकान झाले. मात्र हलगी वादनाचा सराव दररोज न चुकता असतो. असे ही विठ्ठल मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीIndapurइंदापूर