पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बससेवा सुरू करण्यात मान्यता मिळाली आहे. त्यानुसार या भागातील औद्योगिक व धार्मिक ठिकाणांना शहराशी जोडले जात आहे. पीएमपीकडून १२ डिसेंबरपासून जेजुरी, रांजणगाव, चाकण आदी औद्योगिक वसाहतींसह धार्मिक ठिकाणांणा जोडणारी बससेवा बससेवा सुरू केली. या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. त्यामुळे पीएमपीचे प्रवासी उत्पन्नही वाढू लागले आहे. सासवड ते जेजुरीदरम्यान दररोज १३ बस धावत असून रविवारी (दि. २०) सुट्टीच्या दिवशी सुमारे सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्याखालोखाल रांजणगाव मार्गावर १ लाख १६ हजार उत्पन्न मिळाले आहे. यवत, तळेगाव व शिक्रापुर मार्गाचे उत्पन्न ५० हजारांचे पुढे आहे.
दरम्यान, पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नातही वाढ होत असून २० डिसेंबर रोजी सुमारे ६२ लाख ३४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर सोमवारी (२१ डिसेंबर) सकाळच्या सत्रात सर्वाधिक ४४ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती जगताप यांनी दिली.
--------------
काही मार्गांचे प्रवासी उत्पन्न (दि. २० डिसेंबर)
जेजुरी - १ लाख २१ हजार ३९५
रांजणगाव - १ लाख १६ हजार ४१५
चाकण-शिक्रापुर - ६८ हजार ३२५
चाकण-तळेगाव - ४४ हजार ७९५
यवत - ५० हजार ४५५
सारोळा - ३७ हजार २२९
राहु - २७ हजार १००
---------------
नवीन मार्गांवर नियमित बस व कमी तिकीट दर यांमुळे प्रवाशांचा या मार्गांवरील प्रतिसाद वाढत आहे. या सेवेमुळे एमआयडीसी तसेच धार्मिक ठिकाणे आणि परिसराला पुण्याशी जोडणे शक्य झाले आहे.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
-----------------