पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने तळेगाव दाभाडे टप्पा क्रमांक ४ मधील निगडे, आंबळे, कलाट आणि पवळेवाडी या चार गावांतील ५ हजार एकरांवर एमआयडीसी उभारण्यात येत आहे. त्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे ले-आऊट आणि भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती एमआयडीसी पुणे-१ चे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली.
पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक महामार्गाला जवळच टप्पा क्रमांक ४ ची औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. त्यामुळे उद्योगांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचा असणार आहे. या चार गावांतील भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ले-आऊट होऊन वेगवेगळ्या उद्योगांना जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातून येथे अनेक उद्योग येणार आहेत.
पॉईंटर्स
* निगडे-आंबळे एमआयडीसी
जमीन अधिग्रहण : ५ हजार एकर
वर्ष : २०१९
उद्योगांना हस्तांतरण : सहा महिन्यांत होणार
-------
सध्या प्रकल्प कुठे आहे ?
एमआयडीसीसाठी लागणारी पाच हजार एकर जमीन अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहे. तसेच ले-आऊट आणि पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत उद्योगांना जमीन वाटप होऊन, त्यानंतर प्रत्यक्ष उद्योग उभारणीस सुरुवात होईल.
--------
अनेकांना मिळणार रोजगार
कोट
१) एमआयडीसी या परिसरात होणार असल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे केवळ गावातीलच नाही तर तळेगाव दाभाडे-चाकण परिसरातील युवकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
- अरुण दाभाडे, तरुण
------
२) एमआयडीसीमुळे प्रत्यक्ष रोजगार तर मिळेलच. पण अप्रत्यक्षपणे अनेकांना छोठे-मोठे व्यवसाय उभारता येतील. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे.
- प्रफुल्ल मांडेकर, तरुण
------
जिल्ह्यातील १५ एमआयडीसीत शंभर टक्के काम सुरू
चाकण, बारामती, भिगवण, इंदापूर, जेजुरी, पणदरे, रांजणगाव, कुरकुंभ, तळवडे, खेड (एसईझेड), पिंपरी, तळेगाव फ्लोरिकल्चर, तळेगाव औद्योगिक वसाहत आदी औद्योगिक वसाहती शंभर टक्के काम सुरू झाले आहे. तर खराडी नॉलेज पार्क आणि हिंजवडी इन्फोटेक पार्क आदी आयटी वसाहतीत आता प्रत्यक्ष आणि वर्क फ्रॉम होम अशा दोन्ही स्तरावर काम सुरू आहे.