सोमेश्वरनगर : अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील ऊसतोडणी कामगार वाहतूकदारांच्या संपात फूट पडली आहे. राज्यातील पाच संघटनांमध्ये एकमत न झाल्याने ही फूट पडली. बीड येथील दत्तात्रय भांगे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार व मुकादम संघटनेने संपातून माघार घेतली आहे. मात्र, जोर्पयत ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोर्पयत संप चालूच राहणार असल्याचे गहिनीनाथ थोरे-पाटील यांच्या राज्य ऊसतोडणी वाहतूकदार संघटनेने स्पष्ट केले आहे.
नोव्हेंबर महिना उजाडला तरीही राज्यातील बहुतांश साखर कारखाने बंदच आहेत. गळीत हंगामाबाबत अनिश्चीतता वाढल्याने कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत पडला होता. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू गळीत हंगामात राज्यातील साखर कारखान्यांपुढे सुमारे 8क्क् ते 85क् मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कारखाने ऑक्टोबर महिन्यातच चालू होणो आवश्यक होते.
मात्र, आता ऊस तोडणी कामगारांच्या संपात पडलेल्या फुटीमुळे कारखानदार व ऊस उत्पादक शेतक:यांनी सुटकेचा नि:श्वास
सोडला आहे.
राज्यातील ऊस तोडणी व वाहतूकदार संघटनांनी ऊस तोडणी कामगारांच्या व वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी 2क् ऑगस्टपासून संपाचे हत्यार उपसले होते. मात्र, त्यानंतर लागलेली विधीसभेची आचारसंहिता, त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईर्पयत या संपाचे घोंगडे भिजतच पडले आहे.
ऊस तोडणी व वाहतूकदार संघटनेत अगोदरपासूनच एकमत नसल्याने राज्यातील काही कारखाने एक महिन्यापूर्वीच चालू झाले आहेत. साखर संघाचे अध्यक्ष
विजयसिंह मोहीते पाटील यांचा सहकार महर्षी, साखरवाडी, सोलापुर जिल्ह्यातील अनेक कारखाने पुणो जिल्ह्यातील विघ्नहर, घोडगंगा, संत तुकाराम, भीमाशंकर हे कारखाने
सुरू आहेत.
जिल्ह्यातील इतर कारखान्यांवर काल पासून ऊस तोडणी कामगार येण्यास सुरूवात झाली आहे. या संपातील काही अटी मान्य झाल्या असत्या तर ऊस तोडणी कामगारांना सरासरी एका टनाला 8क् रूपये वाढवून मिळणार होते.
राज्यात 8क्क् लाख मेट्रीक
टन उसाचे गाळप झाले असते.
यामुळे 8क् रूपयांप्रमाणो राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या खिशात जवळपास 65क् कोटी रूपये
पडले असते. ऊसतोडणी कामगारांच्या संपात फुट पडल्याने आता येत्या चार-पाच दिवसात
सर्व ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर दाखल होतील. दि. 1क् नोव्हेंबरच्या आसपास राज्यातील साखर
कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
(वार्ताहर)
गहीनीनाथ थोरे यांची संघटना घरातील लोकांची संघटना आहे, त्यात बाहेरचा एकही माणूस नाही. आमच्या संघटनेनेही संप केला होता. तसे साखर आयुक्त, साखर संकुल व सहकार मंत्र्यांना आम्ही चार महिन्यांपूर्वीच निवेदन दिले आहे. आमच्या संघटनेच्या लवादावर मंत्री पंकजाताई मुंडे यांची नेमणूक केल्यावर सरकार स्थापन होताच मागण्यांबाबत निर्णय घेण्याचा शब्द दिल्यावर आम्ही शब्द मागे घेतला
- सुखदेव सानप ,
महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार,
वाहतूक व मुकादम संघटनेचे संचालक
दत्तात्रय भांगे यांच्या संघटनेने कोणालाही विचारात न घेता चर्चा न करता साखर कारखान्यांना मॅनेज होऊन संप मागे घेतला आहे. मात्र, आमची संघटना मागण्यांवर ठाम असून ऊसतोडणी व वाहतूकदारांना न्याय मिळवून देणार.
- गहिनीनाथ थोरे पाटील,
अध्यक्ष, ऊसतोडणी कामगार वाहतूकदार संघटना