शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

शहरातील फेरीवाल्यांचे स्थलांतर

By admin | Published: March 04, 2016 12:50 AM

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शहरातील २८८ ठिकाणे निश्चित करून, त्याठिकाणी फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा होणार नाही

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शहरातील २८८ ठिकाणे निश्चित करून, त्याठिकाणी फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा मोकळ्या जागा, कमी गर्दीचे रस्ते यासाठी निवडण्यात आले आहेत, अशी माहिती अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अतिक्रमणविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. बेकायदेशीर पथारी व्यावसायिक, हॉटेल, टेरेसचे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांकडून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत शहरतील पथारी व्यावसायिकांचे अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रधारकांचे वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने स्थलांतर केले जाणार आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने पुढाकार घेऊन शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला. त्यामध्ये व्यवसायाचे स्वरूप, ठिकाण, क्षेत्रफळ निश्चित केले. संबंधित फेरीवाल्याचे छायाचित्र काढून घेऊन त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांवर त्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. पथारी व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी पथारी व्यावसायिक संघटनेकडून केली जात आहे. फेरीवाल्यांना याअंतर्गत जागा निश्चित करून देण्यात आल्या तरी त्यांनी त्याठिकाणी कायमस्वरूपी दुकान मांडता येणार नाही. अन्नपदार्थ शिजविले जाऊ नयेत अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत.> या सर्वेक्षणानुसार औंध ९१४, कोथरूड ६९३, घोले रोड १ हजार २११, वारजे कर्वेनगर १ हजार ६८, ढोले पाटील रोड १ हजार ४२५, नगर रोड ८२१, येरवडा ७९९, टिळक रोड १ हजार ३०१, भवानी पेठ ६०८, विश्रामबाग वाडा २ हजार ४०८, सहकारनगर ८८७, कोंढवा-वानवडी ९४८, धनकवडी ९०५, बिबवेवाडी ८१८ आणि हडपसर ८९७ आदी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.