पुणे : गो रक्षक म्हणून गो शाळा चालविण्यावरुन झालेल्या वादातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना गो रक्षकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली़. ही घटना पुरदंर तालुक्यातील झेंडेवाडी येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला़. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित मोडक व विवेक मोडक हे वडकीमध्ये हंबीरराव मोहिते गो शाळा चालवितात़. गो रक्षा संबंधी एक महिन्यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती़. तेव्हा मिलिंद एकबोटे यांना सबुरीने घेण्यास सांगितले होते़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़. पुूरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जवळच असलेल्या शनि मंदिरासमोर जेवणासाठी बसले असताना तेथे पंडित मोडक , विवेक मोडक , निखिल दरेकर हे ४० ते ५० लोकांचा जमावासह आले. पंडित मोडक यांनी एकबोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सासवड मध्ये राहायचे नाही अशी धमकी दिली. तसेच एकबोटे यांना मारहाण केली़. अभिषेक वाघमोडे याच्या हातावर चाकून चाकूने वार केला़. प्रतिक गायकवाड याला देखील जमावाने मारहाण करुन डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला़. आपल्यावर असलेल्या रागातून पंडित मोडक, विवेक मोडक यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली़. या गुन्हयाचा तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.बी.घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस करत आहे.
समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:55 PM