पुणे : सभा न घेण्याच्या अटीवर हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने अॅट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगूरे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. दर सोमवारी ३ ते ६ या वेळेत शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे. ८ दिवसांत पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, न्यायालयाच्या परवानगी शिवाय भारत सोडून न जाणे अशा विविध अटी व शर्तीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु अटी व शर्तीचा भंग झाल्यास तत्काळ अटक होईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात सर्व प्रथम गुन्हा दाखल झाला. अनिता साळवे या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी शिवाजीनगर न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला. तर दुसऱ्या एका गुन्ह्यात शिरूर न्यायालयाने एकबोटेना पोलीस कोठडी सुनावलेली आहे
मिलिंद एकबोटे यांना अॅट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:35 PM
सभा न घेण्याच्या अटीवर हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने अॅट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे.
ठळक मुद्देकोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात सर्व प्रथम गुन्हा दाखल अटी व शर्तीचा भंग झाल्यास तत्काळ अटक होईल असेही आदेशात नमूद