शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

बदलत्या युध्दशैलीनुसार लष्करी शिक्षण : मायकल मैथ्युज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 7:44 PM

१८२० साली स्थापन झालेल्या बॉम्बे सॅपर्सला यावर्षी २०० वर्षे पूर्ण युध्दभूमीत जलद गतीने काम करण्यासाठी सॅपर्सकडून काम

ठळक मुद्दे१८२० साली स्थापन झालेल्या बॉम्बे सॅपर्सला यावर्षी २०० वर्षे पूर्ण वयाची सत्तरी पार केलेल्या अधिकाऱ्यांकडून पॅरा डायव्हिंग सॅपर्सचे अनेक निवृत्त अधिकारी व जवानही आवर्जुन सहभागी लढाऊ विमानातून ६ ते १२ हजार फूट उंचीवरुन उडी घेऊन उपस्थितांचे जिंकली मने

पुणे : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात बदलत्या युध्द शैलीनुसार जवानांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, याकरिता कृत्रिम बुध्दिमत्ता व यंत्रमानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व बॉम्बे सॅपर्सचे कमांडन्ट कर्नल मायकल मैथ्युज यांनी दिली.खडकी येथील बॉम्बे सॅपर्सला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिघी येथे खास पॅरा डायव्हिंग व पॅरा ड्रॉप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, ब्रिगेडीअर एम. जे. कुमार यावेळी उपस्थित होते. मैथ्युज म्हणाले, युध्द भूमीत जलद गतीने काम करण्यासाठी सॅपर्सकडून काम केले जाते. युध्दभूमीत हॅलिपॅड बांधणे, ट्रॅक तयार करणे, पुल बांधणे या कामांसह, शत्रु राष्ट्राची गतीशीलता कमी करण्याचे महत्वाचे कामही सॅपर्सला करावे लागते. बॉम्बे सॅपर्सने पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही युध्दातील कामगिरीबद्दलचे महत्त्वाचे पुरस्कारही बॉम्बे सॅपर्सला मिळालेले आहेत. १८२० साली स्थापन झालेल्या बॉम्बे सॅपर्सला यावर्षी २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. सॅपर्सच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून देशभरातील सॅपर्सच्या सर्व शाखांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत असून, यामध्ये सॅपर्सचे अनेक निवृत्त अधिकारी व जवानही आवर्जुन सहभागी झाले आहेत. आजच्या पॅरा डायव्हिंगमध्ये ५९ पॅरा ड्रॉप झाले असून, यामध्ये सॅपर्सच्या निवृत्त अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. ----------------------वयाची सत्तरी पार केलेल्या अधिकाऱ्यांकडून पॅरा डायव्हिंग बॉम्बे सॅपर्सच्या माध्यमातून सेवा बजाविलेल्या व वयाची सत्तरी पार केलेल्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांनी दिघी येथील पॅरा डायव्हिंग कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी सहा हजार फूटावरून जंम्प करून यावेळी जवानांचा उत्साह वाढविला. सेवा निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. आर. गोस्वामी आणि निवृत्त ब्रिगेडीअर एस आर माजगावकर अशी या सत्तरी पार केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कार्यक्रमात बॉम्बे सॅपर्सच्या एकूण ५९ अधिकारी आणि जवानांनी लष्कराच्या लढाऊ विमानातून ६ ते १२ हजार फूट उंचीवरुन उडी घेऊन उपस्थितांचे मने जिंकली. सदर पॅरामध्ये सहभाग घेतलेल्या बहुतांशी जणांचे वय हे ५० च्या पुढेच होते. यामध्ये मेजर जनरल एस.के. जसवाल (सेवानिवृत्त), लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस, लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी, ब्रिगेडियर एम़जे़ कुमार आदींचा समावेश होता.

टॅग्स :PuneपुणेdighiदिघीIndian Armyभारतीय जवानwarयुद्ध