लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशभरातील संशोधन संस्थांच्या कार्याची, पारंपरिक ज्ञानाची आणि डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, तोफ, बंदुकाची ओळख करून देणाऱ्या ‘एक्स्पो’या भारतीय विज्ञान संमेलनाचे उद्घाटन केंद्र्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे गुरुवारी केले. एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले नावीण्यपूर्ण संशोधन पाहण्यासाठी पुण्यासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युुसन महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित एक्स्पोच्या उद्घाटन समारंभास विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर, महासचिव ए. जयकुमार, संघटनमंत्री जयंत सहस्रबुद्धे, डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे संचालक डॉ. शेखर मांडे, डीआरडीओच्या एसीई विभागाचे महासंचालक डॉ. पी. के मेहता, संमेलनाचे संयोजक मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते. भारतीय विज्ञान संमेलनात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, कौन्सिल फॉर सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या देशभरातील नामांकित संशोधन संस्थांनी एक्स्पोमध्ये सहभाग घेतला. संमेलनात शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स आहेत. विज्ञान संमेलन येत्या रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
लष्करी सामर्थ्याचे दर्शन
By admin | Published: May 12, 2017 5:05 AM