लोणावळा : मावळ तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा चांगला व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे जनावरांच्या चाºयाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाच्या प्रमाणात साधारणत: २५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.या वर्षी दर दिवशी ४० ते ५० हजार लिटर दूध पुणे जिल्हा दूधउत्पादक संघाकडे संकलित केले जात आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३० ते ३५ हजार लिटर होते. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातून आजही लोणावळा, तळेगाव, देहूरोड, पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरांमध्ये खासगी तत्त्वावर किटलीने दूध घालणाºया दूधवाल्यांचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. जिल्हा दूध संघ व खासगी शीतकेंद्रांची माहिती घेतली असता दुधाचे प्रमाण वाढले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.दूधउत्पादक शेतकºयांकडून आजही हा व्यवसाय तोट्यात असल्याचा सुर ऐकायला मिळतआहे.बाजारपेठेची परिस्थिती पाहता जनावरांना लागणारे पशुखाद्य, औषधे, वैद्यकीय अधिकारी, चारा यांचा खर्च मोठ्या प्रमाणात येत असल्याने म्हशीच्या दुधाला लिटरमागे ६० व गाईच्या दुधाला लिटरमागे ४० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.सध्या दूध दर वाढले की पशुखाद्य, औषधे आदींचे दर वाढत असल्याने शेतकºयाच्यापदरात काहीच पडत नाही. शेतकरी टिकविण्यासाठी शासनाने पशुखाद्य व औषधांचे दर नियंत्रणात ठेवून लिटरमागे शेतकºयांना पाच रुपये अनुदान देणे अपेक्षित आहे. तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरेल अन्यथा शेतकरी या व्यवसायातून बाहेर पडेल, अशी परिस्थिती आहे.
दूध उत्पादन वाढले २५ टक्क्यांनी, दुधाला चांगला भाव मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:45 AM