कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अर्जुण गायकवाड, गणपत चावट, बाबुलाल मोमीन, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, रामभाऊ गायकवाड, शंकर खोले यांनी फसवणुक झाल्याचा आरोप केला आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना मागील दहा पासुन बंद असल्याने, पु्र्व हवेलीमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दौंड व शिरुर तालुक्याताल साखऱ कारखान्यावर अंवलबुन रहावे लागते. लोणी काळभोर, उरुळी कांचन परीसरात गुऱ्हाळे चालु असली तरी, पुर्व हवेलीमधील ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने दरवर्षी शेकडो एकर ऊस गाळपाविना शेतकऱ्यांना सोडून द्यावा लागत आहे. यामुळे मिळेल त्या भावाने, मिळेल त्या व्यापाऱ्याला उस देण्याची वेळ पुर्व हवेलीमधील शेतकऱ्यांच्यावर दरवर्षी येत असते. त्यातच चालु वर्षी पुर्व हवेलीत ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने, दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालकाचे अनेक दलाल ऊसासाठी हवेली तालुक्यात फिरत आहेत. अशाच दलालापैकी एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे परस्पर खर्च करुन शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
याबाबत बोलतांला कदमवाकवस्ती येथील ऊस उत्पादक शेतकरी अर्जुण गायकवाड म्हणाले, लॉकडाऊन काळात दौड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने कदमवाकवस्ती परीसरातील पन्नासहुन अधिक शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाला नेला होता. वरील सर्वच शेतकऱ्या्ंचे ऊसाचे पैसे वेळेवर मिळाल्याने, आमच्या सारख्या पंचविसहुन अधिक शेतकऱ्यांनी मागिल तीन महिण्याच्या काळात वरील व्यापाऱ्याला ऊस दिला होता. मात्र मागिल तीन महिण्याच्या काळात नेलेल्या ऊसाचे पैसे देण्यास संबधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. मागील तीन महिण्याच्या काळात वारंवार मागणी करुनही, व्यापारी वेगवेगळी उत्तरे देऊन शेतकऱ्यांना भेटण्याचे टाळत आहे. व्यापाऱ्याने दौंड तालुक्यातील ज्या ज्या गुऱ्हाळ चालकांना आमचा ऊस दिला अशा सर्व गुर्हाळ चालकांची भेट घेतली असता, व्यापाऱ्याने पैसे ऊसाचे पैसे परस्पर उचललल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान अर्जुण गायकवाड पुढे म्हणाले, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतीलच नव्हे तर लोणी काळभोर, उरुळी कांचनसह या परीसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांचऊस वरील व्यापाऱ्याने नेला असल्याची माहिती मिळत आहे. वारंवार संपर्क साधुनही व्यापारी भेटत नसल्याने, शेतकऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज (मंगळवारी) लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांची भेट घेऊन, व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत.