सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, टँकरला नसलेली जीपीएस यंत्रणा, पाणी भरणा केंद्रांवर बंद अवस्थेतील मीटर यामुळे शहरामध्ये रोज लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे.शहरामध्ये सध्या महापालिकेच्या टँकर पाणी भरणा केंद्रांवर दररोज दहा हजार लिटरचे तब्बल ५०० ते ५५० टँकर अधिकृतपणे भरले जातात. यासाठी विविध दहा ठिकाणी हे टँकर भरणा केंद्र उभारण्यात आली आहेत. एप्रिल-मे महिन्यात महिन्याला तब्बल १६ ते १७ हजार टँकर पाणी महापालिकेच्या केंद्रांवरून दिले जाते. यामध्ये महापालिकेचे टँकर, टेंडरचे टँकर आणि खासगी पासधारक टँकरचा समावेश असतो; परंतु प्रत्येक केंद्रावर नक्की किती टँकर भरले जातात, टँकर ज्या भागासाठी पाणी देणे अपेक्षित आहे तिथेच दिलेजातात का, आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.पाण्याची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी महापालिकेसह खासगी टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; परंतु याकडे प्रशासन व ठेकेदारांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.सध्या शहरामध्ये दररोज ५०० ते ५५० टँकरद्वारे शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येता; परंतु यापैकी केवळ शंभर टँकरलाच जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. याचा कोणताही ‘डाटा’ महापालिकेकडे नाही. त्यामुळे बसवलेली जीपीएस यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दहा टँकर पाणी भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला.मीटर बंदचा झोल पाणीचोरीला पोषकपर्वती येथील टँकर पाणी भरणा केंद्रावरील पाणी मीटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. असे असतानादेखील येथे अविरत टँकर भरण्याचे काम सुरूच आहे. एप्रिल-मे महिन्यात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने या मीटरची दुरुस्ती केली जाईल किंवा मीटर दुरुस्त होईपर्यंत येथील केंद्रावर टँकर भरण्यास बंदी घालण्यात येईल, अशी अपेक्षा होती; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याचा मीटर बंद असून, पाणी भरण्याचे काम सुरूच आहे; तर सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे, पर्वती येथीलच टँकर पॉइंट १, २ व ३ वरील मीटर हवे तेव्हा चालू व बंद करता येत असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. याचाच अर्थ असा की, हे मीटर फक्त शोभेचे असून, हवे तेव्हा चालू व बंद करण्याची सोय असल्यामुळे अनधिकृतपणे टँकर भरले जात असताना, हे मीटर बंद ठेवणे सहज शक्य आहे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचजीपीएस यंत्रणेची माहिती गोळा करणे कठीणमहापालिकेच्या टँकर पाणी भरणा केंद्रांवर दररोज ५०० ते ५५० टँकरमध्ये पाणी भरले जाते.यापैकी केवळ शंभर टँकरलाजीपीएस यंत्रणा बसविण्यात आलीआहे; परंतु या जीपीएस यंत्रणा खासगी स्वरूपात व वेगवेगळ्या ठिकाणी कार्यान्वित असल्याने याचा डाटा गोळा करणे कठीण असते; परंतु लवकरच महापालिकेच्या वतीने सर्व टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.-व्ही. जी. कुलकर्णी,मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग
लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 7:16 AM