शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

शहरातील लाखो लिटर पाण्याच्या चोरीकडे होतेय सोयीस्कर दुर्लक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:09 PM

शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरु असलेल्या ‘आरओ प्लांट’ मधून बिनबोभाट पालिकेचे पाणी उचलले जात असून तेच पाणी फिल्टर करुन चढ्या भावाने सध्या विकले जात आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा विभाग : खासगी आरओ प्लांटमधून पालिकेच्या पाण्यावर डल्लाबेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची साधी माहितीही या विभागाकडे नसल्याचे समोरगुगलवर अथवा जस्ट डायलवर अशा शेकडो व्यावसायिकांची यादी, पत्ता आणि संपर्क क्रमांक

पुणे : . पुण्यावर एकीकडे पाणीकपातीचे संकट घोंघावत असतानाच दुसरीकडे मात्र दररोज लाखो लिटर पाण्याची ‘चोरी’ होत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरु असलेल्या ‘आरओ प्लांट’ मधून बिनबोभाट पालिकेचे पाणी उचलले जात असून तेच पाणी फिल्टर करुन चढ्या भावाने सध्या विकले जात आहे. वर्षाला कोट्यवधींचा ‘टर्नोव्हर’ असलेल्या या व्यवसायाकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असून अशाप्रकारे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची साधी माहितीही या विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. पाण्याच्या ब्रॅन्डच्या नावाखाली कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरुन त्याचे बॉटलिंग करण्याचे प्रकार राजरोस सुरु असताना पालिकेला त्याचा पत्ता लागत नाही हे आश्चर्य आहे. पाणी पुरवठा विभागाने अनधिकृत नळ जोड घेणाऱ्यांविरुद्ध तसेच बेकायदा मोटार बसविणाऱ्यांविरुद्ध मोहिम हाती घेतली आहे. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारा पाणी पुरवठा विभाग या आरओ प्लांट व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात मात्र बोटचेपी भूमिका घेत आहे. वास्तविक, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी काही महिन्यांपुर्वी पाणी पुरवठा विभागाला शहरातील बेकायदा पाणी व्यावसायिकांची यादी दिली होती. तसेच याठिकाणांवरचे  ‘स्टींग ऑपरेशन’ही करण्यात आलेले होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई झाली नाही. अशा पाणी व्यावसायिकांबाबत अधिकाऱ्यांनाही नीटपणे काही सांगता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आम्ही या व्यावसायिकांचा शोध घेऊ शकत नाही. त्यांच्याबाबत ठोस माहिती मिळाल्यावर कारवाई करता येईल अशी मोघम उत्तरे अधिकारी देत आहेत. पाणी टंचाईच्या काळात अधिकारी पाणी चोरीच्या या प्रकाराबाबत गंभीर नसल्याचे किंबहुना सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. गुगलवर अथवा जस्ट डायलवर अशा शेकडो व्यावसायिकांची यादी पत्ता आणि संपर्क क्रमांकासह येते. पाषाण, डेक्कन, औंध, कात्रज, कोंढवा, हडपसर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, शिवणे, कोथरुड आदी भागांमध्ये अशा प्रकारचे प्लांट कार्यरत आहेत. सध्या लग्न सराई असल्याने फिल्टर पाण्याला मोठी मागणी आहे. अशा व्यावसायिकांचा शोध घ्यायचा असे ठरवलेच तर पालिकेला हे काम अवघड नाही. स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांसह पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा हे काम करु शकते. मात्र, तसे होताना दिसत नाही. ====महापालिकेचे पाणी बेकायदेशीरपणे घेऊन लाखो लिटर पाणी फिल्टर करुन राजरोसपणे विकले जात आहे. एरवी टँकरच्या पाण्याच्या चोरीविषयी बोलले जाते, परंतू या प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे. याबाबत स्टींग आॅपरेशन करुन पालिकेला पुरावे आणि 33 व्यावसायिकांची यादी दिली होती. मात्र, त्यावर काहीही कारवाई झाली नाही. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना सर्व माहिती असूनही कारवाई केली जात नाही. सर्वसामान्य पुणेकरांवर पाणी कपात लादणे, नळ जोड तोडणे अशा कामात आघाडीवर असलेले अधिकारी या बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. - डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर====पुणे शहराच्या हद्दीलगत परंतू ग्रामीण भागामध्येही अशा प्रकारचे आरओ प्लांट उभारण्यात आलेले आहेत. या आरओ प्लांटमध्ये पाणी कुठून आणले जाते, त्याच्यावर नेमकी काय प्रक्रिया केली जाते याविषयी पालिकेच्या अधिकाºयांना माहिती देता येत नाही. पालिकेचे अधिकारी अनभिज्ञ असलेल्या व्यावसायिकांपर्यंत दुकानदार, केटरिंग व्यावसायिक मात्र सहज पोचू शकतात अशी स्थिती आहे. सध्या 20 लिटरचा भरलेला जार 50 रुपयांना विकला जातो. तर मिनरल वॉटरचा दर वेगवेगळा आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी