कमी श्रम, कमी पाणी, एकदाच केलेली भांडवल गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा शून्य खर्च, त्याचप्रमाणे पुढील २५ वर्षे येणारे फळ, वाढती मागणी व चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सध्या लाखोंची कमाई करत आहेत.
जून ते नोव्हेंबरपर्यंत झाडाला फळे येतात. झाडाला मोठी फुले येत असल्याने शेतकरी मधुमक्षिका पालनासारखा दुय्यम धंदा करू शकतात. शरीरातील पांढऱ्या पेशींसह रक्त वाढणे, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.
पुणे-मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये याला मोठी मागणी आहे आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये २०० रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. गुरुदास पाचारणे यांनी अवघ्या २ वर्षांमध्ये ३ ते ४ लाखांचे उत्पादन घेतले आहे. यांना कृषी महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थिनी सानिका मच्छिंद्र खेडकर, डॉ. एच. पी. सोनवणे, केंद्रप्रमुख डॉ. डी. ए. सोनवणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. व्ही. बगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.