पुणे : ‘हरी ओम नमस्ते गणपतये’च्या सुमधुर सुरांनी जगभरातील गणेशभक्तांची रविवारची सकाळ मंगलमय झाली. चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाला अथर्वशीर्ष पठणातून वंदन करण्यात आले. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या स्वर्गीय सुरांनी भक्तिमय वातावरणाची अनुभूती आली.‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर आणि ‘भक्ती’ या युट्यूब चॅनेलवर जगभरातून लाखो महिला आणि पुरुषांनी अथर्वशीर्ष पठणाचा लाभ घेतला. सामूहिक अथर्वशीर्ष पठणातून समूहशक्तीचा अनोखा जागर करण्यात आला. या उपक्रमासाठी रोझरी फाउंडेशन, कॅलेक्स ग्रुप आॅफ कंपनी पुणे आणि काका हलवाई स्वीट सेंटर यांचे सहकार्य लाभले.‘लोकमत’च्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईत मनाला उमेद देण्यासाठी प्रसिद्ध गायकपद्मश्री शंकर महादेवन यांच्यासोबत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता. रविवारी सकाळी अकरा वाजता भाविक लोकमत फेसबुक पेजवर घरुनच सहभागी झालेहोते. उपक्रमांतर्गत शंकर महादेवन यांची शैली आणि स्वरांनी लोक भारावून गेले.‘लोकमत’ने महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते केले जातात. हाच समूहशक्तीचा जागर अथर्वशीर्ष पठणाने झाला. शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजासोबत अथर्वशीर्षाचे पठण करताना मनात उत्साह आणि उल्हासाची कंपने निर्माण झाल्याची अनुभूती आली. वेदपाठ शाला पुणेचे मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी गणपती अथर्वशीर्षाचे धार्मिक व सामाजिक आणि नित्य पठणाचे महत्त्व सांगितले.लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला असताना अथर्वशीर्ष पठणातून भक्तीरसाच्या चैतन्याची मनसोक्त उधळण झाली. यंदा कोरोनामुळे ‘ती’चा गणपती उत्सव प्रत्यक्ष सहभागातून साजरा करता आला नसला तरी आॅनलाइन सोहळा आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे. ‘तीचा गणपती’साठी एकत्र येणे ही महाराष्ट्राची नवीन गौरवशाली परंपरा झाली आहे. या परंपरेनुसार अथर्वशीर्ष पठणाच्या भक्ती सोहळ्यात भाविक सहभागी झाले होते. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.‘लोकमत’ने महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. हाच समूहशक्तीचा जागर आजच्या अथर्वशीर्ष पठणाने रविवारी सकाळी ११ वाजता लोकमत फेसबुक पेजवर आपण केला. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजासोबत अथर्वशीर्षाचे पठण करताना आपल्या मनात उत्साह आणि उल्हासाची कंपने निर्माण झाली. त्यातून कोणत्याही संकटाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळेल, असा मला विश्वास आहे. गणपती बाप्पा मोरया..!!- विजय दर्डा, चेअरमन,लोकमत एडिटोरियल बोर्डअथर्वशीर्षाच्या सुरांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि ताकद आहे. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमात सुरांच्या माध्यमातून गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो आहे. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात या कार्यक्रमाने सकारात्मक वातावरण घराघरात निर्माण झाले. ‘लोकमत’ समूहाच्या ‘ती’चा गणपती संकल्पनेमुळे हे देशातील सर्वात मोठे अथर्वशीर्ष पठण शक्य झाले. याबद्दल ‘लोकमत’ समूहाचे मी अभिनंदन करतो. यातून संकटाचा सामना करण्याची नक्कीच ताकद मिळेल.- पद्मश्री शंकर महादेवन, प्रसिद्ध गायक
‘लोकमत’च्या व्यासपीठावर जगभरातून लाखो लोकांचा अथर्वशीर्ष पठणात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:26 AM