५ हजार पक्ष्यांपासून सुरू केलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये आज १० हजार पक्षी आहेत, ऑटोमायझेशन पद्धतीमुळे पक्ष्यांची निगा राखणे सोपे झाले आहे. चिक्स पक्ष्यांना ठेवण्यासाठी अद्ययावत कंपार्टमेंट तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे पक्ष्यांचे आरोग्य चांगलं राहतं आणि वाढ चांगली होते. व्यवस्थापनामध्ये नामवंत कंपनीचे खाद्य देतात ते थोडे महाग पडले, तरी उत्पादन वाढते आणि दर दहा दिवसाला पक्ष्यांना लसीकरण दिले जाते. कृषी विज्ञान केंद्र कृषी महाविद्यालय बारामतीचे कृषिदूत रोहित तुकाराम खाडे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत संवाद साधला, या वेळी त्यांनी माहिती विशद केली.
पोल्ट्री वाढवत असताना त्यातील उष्ण हवामानात पक्षी जपणे अवघड होते. तसेच पक्षांना हीटस्ट्रोक बसण्याची शक्यता असते, जास्त तापमानात पक्षी कमी खातात व वजन घटून अशक्त होतात यामुळे शेडमध्ये तापमान नियंत्रित राहावे म्हणून फॉगर्स सिस्टिम, एक्झॉस्ट फॅन, कूलिंग पॅडचा समावेश आहे. थंड हवामानातही मार्ग काढत हॉलमध्ये गॅसब्रूडर बसवले आहेत, विजेच्या सातत्याने होत असलेल्या भारनियमनावर मात करण्यासाठी दोन जनरेटर सेटही घेतले आहेत, वातानुकूलनासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्यासाठी दोन बोअर खोदले असून एक विहीर केली आहे यातून वर्षभर उद्योगाला लागणारे पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.
एका लॉटला १० हजार पक्षी विक्रीसाठी जातात, ४० दिवसांत एक लॉट जातो वर्षभरात सरासरी ६ लॉट जातात. व्यवस्थापन आणि मजुरी खर्च वजा करता एका लॉटला त्यांना दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे, वर्षभरात सरासरी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने खारतोडे यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याची संकल्पना केली. शेतीपूरक व्यवसायातून लाखोंचं उत्पन्न मिळत आहे.
कळस येथील अनिल खारतोडे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाला
कृषिदूत रोहित तुकाराम खाडे कार्यानुभव अंतर्गत संवाद साधला.